Satara : सातारा पोलिसांचा क्रीडा स्पर्धेत दबदबा कायम; सलग तीन वेळा जिंकले सर्वसाधारण विजेतेपद !
विजयी खेळाडूंनी पोलीस प्रमुख तुषार दोशी यांना घेतले खांद्यावर उचलून
सातारा : ५१ वी कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा बारामती येथे दि १६ ते २१ दरम्यान पार पडली, या स्पर्धेत सातारा,सांगली,कोल्हापूर,पुणे ग्रामीण, सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील पुरुष आणि महिला खेळाडूंनी सहभाग घेतला.
सातारा जिल्हा पोलिसांनी सलग तीन वेळा सर्वसाधारण विजेतेपद पटकावून जिल्हा पोलीस दलाचे नाव कोल्हापूर परिक्षेत्रात अभिमानाने उंचावले आहे,२०२५ ची पुरुष जनरल चॅम्पियनशिप विजेते आणि महिला जनरल चॅम्पियनशिप विजेतेपद हे सातारा जिल्हा पोलिसांनी पटकावले आहे. संपूर्ण परिक्षेत्रात सातारा जिल्हा पोलीस दलाचा दबदबा कायम राखण्यात पोलीस खेळाडूंना यश आले आहे.
यामध्ये हॉलीबॉल,फुटबॉल,हॉकी,हँडबॉल,बास्केटबॉल, खो-खो,कबड्डी,कुस्ती,जुदो, स्विमिंग, ॲथलेटिक्स क्रॉस कंट्री,ओशो या खेळाचा समावेश होता, जिल्ह्यातून१४० पोलीस खेळाडूंनी भाग घेतला, कोल्हापूर पोलिसांना केवळ १४९ पॉईंट मिळवता आले तर सातारा पोलिसांनी तब्बल २०७ पॉईंट मिळवून प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद स्वतःकडे राखण्यात यश मिळवले,सातारा जिल्हा पोलीस दलास बक्षीस वितरण सोहळा पार पडल्यानंतर उपस्थित खेळाडूंनी एकच जल्लोष करत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना अक्षरशः खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला,
विजयी खेळाडूंनी विजयाचे श्रेय वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले,पोलीस अधीक्षकांनी खेळाडूंवर जो विश्वास दाखवला, खेळाडूंना सर्व सुविधा उपलब्ध केल्या,त्यांच्या पाठीशी राहून त्यांना प्रोत्साहन देत त्यांचे मनोबल वाढवले त्यामुळे हे विजेतेपद सातारा पोलिसांना मिळाले, सर्व खेळाडूंना पोलीस अधीक्षक तुषार दोशी,अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर,सहायक पोलीस निरीक्षक अभिजित यादव,क्रीडा प्रमुख संकपाळ यांची मोलाची साथ मिळाली.