सातारा ही शूरांची अन् थोरांची भूमी
सातारा :
सातारा हे आगळेवेगळे ठिकाण आहे. सातारा ही पराक्रमाची भूमी आहे. सुधारकांची, साहित्यकांची भूमी आहे. महात्मा ज्योतीराम फुले हे कटगुणचे, सावित्रीबाई फुले या नायगावच्या आहेत. या सगळ्यांचा जन्म साताऱ्यात झाला. या भूमीत अनेक थोर नेत्यांनी संघर्ष केला. हा इतिहासातील महत्त्वाचा भाग आहे. या संमेलनाचा उद्देश मराठी माणसांच्या मनात मराठी भाषेबद्दल आदर व प्रेम निर्माण करण्याचा आहे. भाषेचे महत्त्वही पटवून दिले पाहिजे. या संमेलनाच्या निमित्ताने अनेक लोक येथे आले. यामुळे विचारांची देवाण घेवाण होईल. जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने छ. शिवाजी कॉलेज सातारा येथे आयोजित 20 वे जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा यांचा उद्घाटन सोहळा रयतचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, स्वागताध्यक्ष रामदास फुटाणे, ज्येष्ठ साहित्यिक दत्तप्रसाद दाभोळकर, ज्येष्ठ लेखक आ. ह. साळुंखे, डॉ. विश्वजीत कदम, अभिनेते सयाजी शिंदे, डॉ. अनिल पाटील, माजी खा. श्रीनिवास पाटील, माजी आ. बाळासाहेब पाटील, अभिनेते सयाजी शिंदे, व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खा. पवार म्हणाले, या संमेलनात आपण उद्योजकांचा सन्मान केला. याचा मला अभिमान आहे. हे यशस्वी उद्योजक आहेत त्यांनी कष्ट केले. उद्योजक म्हणून दर्जेदार काम केले. आज त्यांच्याकडे अनेक संस्था आहेत त्या संस्थेकडे स्वच्छतेचे काम आहे. रविंद्र खांडेकर हे अत्यंत उत्तम काम करत आहेत.
खा. पवार पुढे म्हणाले, एआयच्या माध्यमातून अधुनिक शेती कशी करायचे याचे सशोधन करून ऊसाचे पीक आम्ही घेत आहोत. हे पाहण्यासाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे. इतर जिह्याप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापूर येथेही उद्योग होऊन या जिह्याचाही विकास झाला पाहिजे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधुनिक शेती करून नवे उदाहरण दिले आहे. अनेक लोकांनी शुन्यातून सुरूवात केली. अत्यंत यशस्वीपणे हा सोहळा संपन्न होईल.
भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर भाषेचे संवर्धन कसे होते यावरही चर्चा होते. आणि राजकारण्यांनी मराठी कसे बोलावे यावरही चर्चा होते. ही अत्यंत समाधनाची गोष्ट आहे. या संमेलनासाठी तुम्ही शासनाकडे कुठेही अर्ज केलेला नाही. मराठी भाषेचा मंत्री म्हणून आज या व्यासपिठावरून पवार साहेबांच्या साक्षीने आज शब्द देतो, असा प्रस्ताव जर मराठी भाषेकडे पाठविला तर अनुदान देण्याची ग्वाही या कार्यक्रमात देतो. या कार्यक्रमात विद्यार्थी सहभागी होत आहेत ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. मराठी उद्योजक जर पुन्हा महाराष्ट्रात येऊन उद्योग निर्माण करत असेल तर इन्सेटीव्हची पॉलिसी जाहीर करणार आणि मदत करणार येत्या दोन महिन्यात ते पूर्ण करणार आहे.
मंत्री आशिष शेलार म्हणाले, वीस वर्ष सातत्याने एखादे जागतिक साहित्य संमेलन करावे. आणि ते सुद्धा भव्य स्वरूपात करावे. त्याच्या आयोजनामध्ये कात्री न लावता सर्व गोष्टी त्यामध्ये असाव्यात आणि मराठी मनाला त्याचा पुरेपुर आनंद घेता यावा यासाठीचे पूर्ण नियोजन करताना कुठल्याही सरकारी अनुदानाची अपेक्षा न करता हे संमेलनाचे आयोजन केले त्याबद्दल मी आयोजकांचे अभिनंदन करतो. साताऱ्यात हे संमेलन होतेय ही भूमीच शूर, परक्रमी अशी आहे. या भूमीमध्ये एका गोष्टीचा जरूर उल्लेख केला पाहिजे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर झालेले हे पहिले साहित्य संमेलन असल्याचे माझे मत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते म्हणाले की, हे सरकार सर्वपक्षीय विचारधारेशी व पक्षाशी संवाद करेल. यामुळे देवेंद्रजींमुळे मला या संमेलनात सहभागी होण्याचा आनंद मिळाला.