For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमदार सतेज पाटलांनी सांगितला महापालिका निवडणुकीचा फॉर्म्युला

03:40 PM Jan 11, 2025 IST | Pooja Marathe
आमदार सतेज पाटलांनी सांगितला महापालिका निवडणुकीचा फॉर्म्युला
Advertisement

पालकमंत्री पदाबाबत सरकारच घोड कुठं आडलं आहे सतेज पाटलांचा सवाल
कोल्हापूर

Advertisement

यापूर्वी सुद्धा कॉंग्रेस राष्ट्रवादी एकत्र असतानाही आम्ही अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणुका लढल्या आहेत. जिथं शक्य होईल तिथं युती करू. त्यामुळे मुंबई, ठाणे यांसारख्या काही महापालिकामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी स्वतंत्रपणे लढण्याच्या भूमिका घेतल्या आहेत. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. कोल्हापूरचा विचार केला तर इथं आमची युती व्हायला काही अडचण नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत अनेक कार्यकर्ते इच्छुक असतात. त्यामुळे वेगळे लढल्यामुळे महाविकास आघाडी मध्ये फुट पडली आहे असे नाही. महायुतीचाही निर्णय बाहेर आला आहे, मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितले आहे, जिथं शक्य तिथं युती करणार, स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे पक्षांमध्ये फुट असे नाही. जो पक्ष निर्णय आहे तो घेऊन आम्ही पुढे जा, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले.

यावेळी ते म्हणाले, कॉंग्रेस हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे जिथे आमची ताकद आहे तिथे आम्ही लढूच. यानिवडणुक पूर्व किंवा निवडणुक पश्चात युती ही वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थ्यामध्ये परिस्थितीनुसार होईल. २२ जानेवारीला सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. या सगळ्या निवडणुका पावसाळ्याच्या आधी घेऊ शकतो का ? कोणत्या निवडणुका पहिल्या होणार यावर पुढील गोष्टी ठरतील. विधानसभेचा पॅटर्न वेगळा आणि महापालिकेचा पॅटर्न वेगळा असतो. गेल्या ४ वर्षांपासून प्रशासकाच्या राज्याला जनता कंटाळलेली आहे. सगळा अंदाधुदी कारभार चालू आहे. मुंबई महापालिकेंतर्गत दिड लाख कोटींची कामं चालू आहेत. यासाठीचा निधी कोठून उपलब्ध होणार आहे माहित नाही. या सगळ्याला मुंबईची जनता वैतागलेली आहे. त्यामुळे या सगळ्या कारभारावर जो कंट्रोल भाजपने ठेवलेला होता, त्याला कंटाळून जनतेच बहुमत आमच्या बाजूने येईल याची आम्हाला खात्री आहे.

Advertisement

पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले, ओबीसी आरक्षणाबद्दलची याचिका आणि शिवसेनेने प्रभाग रचनेबद्दलची एक याचिका दाखल केली आहे. आहे ती प्रभाग रचना राहील की त्यात शासनातर्फे बदल करण्यात येणार आहे. २२ तारखेला लागणाऱ्या निकालनंतर सगळं स्पष्ट होईल. त्याला आम्ही सोमोरे जाऊ. मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सहानुभुती दाखवण्याचा प्रयत्न विधान सभेला केला आहे. त्यातून शिवसेनेबद्दल सहानुभूती आहे की नाही हे दिसून आले. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा आमच्या महाविकास आघाडीवर फार काही परिणाम होईल असे नाही. सरकारच्या चांगल्या कामाला कोण पाठींबा देणार नाही असे होणार नाही. चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवणं हे विरोधक म्हणून आमची जबाबदारी असते.

याप्रसंगी बीड मधील सरपंच हत्या प्रकरणावर विचारणा झाल्यावर आमदार पाटील म्हणाले, आमची पहिल्यापासून मागणी होती की कारवाई झाली पाहिजे. निपःक्ष चौकशी व्हायला पाहिजे. या प्रकरणाची चौकशी एसआयटी करणार आहे का ? चौकशी पूर्ण होऊन चार्ड शीट फाईल होत नाही तो पर्यंत शासनाची भूमिका करणार नाही. आरोपी अटकेत आहेत. चार्जशी फाईल झाल्यावर शासनाची भूमिका कळेल.

Advertisement
Tags :

.