उन्हाळी हंगामासाठी एसटीचा सातारा विभाग सज्ज
सातारा :
उन्हाळी हंगामासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सातारा विभाग सज्ज झाला आहे. दि. १५ एप्रिल ते १६ जूनपर्यंत उन्हाळी हंगामानिमित्त पुणे, मुंबई, बोरिवली, स्वारगेटसह अन्य मार्गावर जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय कमी होणार आहे.
उन्हाळी हंगामात गावोगावच्या यात्रा-जत्रा, लग्न समारंभ यासारखे धार्मिक कार्यक्रम असतात. तसेच अमृत ज्येष्ठ नागरिक सवलत योजना व महिला सन्मान सवलत योजनेमुळे प्रवाशांचा ओडा एसटीकडे मोठ्या प्रमाणात - वाढला आहे. त्याचा परिणाम खाजगी वाहतुकीवर झाला आहे. तसेच एसटीकडे नवीन बसेस आल्या आहेत. त्यामुळे या बसेसही लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडल्या जात आहेत. उन्हाळी आदा वाहतुकीचे योग्य नियोजन महामंडळाच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, मेढा, पारगाव खंडाळा, फलटण, कोरेगाव, दहिवडी, वडूज या ११ आगारात करण्यात आले आहे. उन्हाळी हंगामात सातारा आगारातून बोरीवली, मुंबई सेंट्रल, गणपतीमुळे, अहिल्यानगर, स्वारगेट.
- सलग सुट्ट्यांमुळे गर्दी...
दि. १० एप्रिलपासून सलग सुट्ट्या असल्याने प्रवाशी गर्दीत होणारी वाढ लक्षात घेवून टप्या टप्प्याने उन्हाळी जादा वाहतुकीच्या फेऱ्या विविध मार्गावर चालवण्यात येणार आहेत. त्यानुसार महामंडळाच्या सर्वच्या सर्व ११ आगारात नियोजन करण्यात आले असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड यांनी दिली. कराड आगारातून विजापूर, लातूर, सोलापूर, स्वारगेट, मुंबई, अक्कलकोट, पंढरपूर, दादर, कोरेगाव आगारातून सोलापूर, स्वारगेट, परळ, ठाणे, फलटण आगारातून बोरिवली, तुळजापूर, बारामती, परळ, धाराशिव, सांगली, अक्कलकोट, बुलढाणा, शिर्डी, बाई आगारातून स्वारगेट, संभाजीनगर, शिर्डी, पाटणमधून सोलापूर, स्वारगेट, परेल, दहिवडीतून वरळी मुंबई, परेल, लातूर. महाबळेश्वरमधून महाड मुंबई, पुणे स्टेशन, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, वाई मुंबई, मेड्यातून सोलापूर, ठाणे, नरसिंहवाडी, मुंबई सेंट्रल पारगाव-खंडाळामधून परेल, जुन्नर, पंढरपूर, बडूजमधून जोतिबा, सांगली, सातारा, ठाणे यासह विविध मार्गावर जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
उन्हाळी हंगामासाठी एसटीचा सातारा विभाग सज्ज झाला असून सर्व आगारप्रमुखांनी वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन जास्तीत जास्त प्रवाशांची सोय करून उत्पनात भरीव वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत.
तसेच बारमाही मंजूर फेऱ्या व जादा फेऱ्या संगणकीय आरक्षणासाठी प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या आहेत. उन्हाळी हंगामातील जादा वाहतूक तोट्यात चालू राहिल्यास कार व्यवस्थापक, सहायक वाहतूक अधिक्षक, वाहतूक निरीक्षक यांनी जबाबदार धरून कारवाई करण्यात येणार आहे.