कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Satara News : सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम बडतर्फ

04:23 PM Oct 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

                                                       पाच लाखांची लाच मागितल्याचा होता आरोप

Advertisement

सातारा : सातारा जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश नुकतेच काढण्यात आले आहेत. त्यांना ऑक्टोबरपासून पदमुक्त होण्यास सांगण्यात आले होते. जामीन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप निकम यांच्यावर होता.

Advertisement

त्यांनी याप्रकरणी गुन्हा अटकपूर्व जामिनासाठी आधी दाखल झाल्यानंतर सत्र न्यायालयात व नंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु दोन्ही न्यायालयांनी त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. तथापि, त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले नव्हते.

याप्रकरणी त्यांची उच्च न्यायालय प्रशासनाच्या शिस्तपालन समितीकडून चौकशी होऊन अहवाल सादर करण्यात आला होता. त्या अहवालाच्या आधारे त्यांच्या बडतर्फीचा आदेश काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख यांनाही बडतर्फ करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
_satara_news#Maharastra#satarahight courtsupremecord
Next Article