मुलांवरून उडी मारतात सैतान
स्पॅनिश समुदायातील अनोखी परंपरा
स्पॅनिश लोकांमध्ये एल कोलाचो नावाने ओळखला जाणारा सण ईस्टरच्या 60 दिवसांनी आयोजित होत असतो. बेबी जंपिंग फेस्टिव्हल एक बाप्तिस्मा सेरेमनी असून यात मागील वर्षी जन्मलेल्या मुलांचा सहभाग असतो. ही धार्मिक प्रथा 1600 सालापासून चालत आली आहे.
पुढील वर्षासाठी स्वत:चे दुर्भाग्य दूर करण्यासाठी रस्त्यांवर उभे प्रेक्षकही कोलाचोवर ओरडतात. यानंतर लहान मुलांवर गुलाबच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जातो आणि त्यांचे आईवडिल त्वरित त्यांना स्वत:कडे घेतात. एक वर्षापूर्वी जन्मलेल्या मुलांना रस्त्यांवर गाद्या अंथरून ठेवले जाते. तर वेशभुषाधारी पुरुष त्यांच्यावरून उडी घेत असतात. या प्रथेत सैतान मुलांच्या पापांना अवशोषित करून घेतो आणि त्यांना आजार अन् दुर्दैवापासून सुरक्षा प्रदान करतो असे मानले जाते. यादरम्यान लाल अन् पिवळ्या रंगाची वेशभूषा केलेले लोक ‘सैताना’प्रमाणे रस्त्यांवरून धावतात आणि ग्रामस्थांचा अपमान करतात आणि त्यांना छडीला जोडण्यात आलेल्या घोड्याच्या शेपटीने मारत असतात. एल कोलाचो हा सण 1620 च्या दशकातील आहे. याची सुरुवात नेमकी कधी झाली हे स्पष्ट नाही, परंतु काही इतिहासकारांनुसार याची सुरुवात प्रजनन अनुष्ठानाच्या स्वरुपात झाली असण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या मध्यास स्पेनच्या
कॅस्ट्रिलो डी मर्सिया गावात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ही प्रथा वाईट शक्तींवरील चांगल्या शक्तींच्या विजयाचे प्रतिनिधित्व करते.