सर्वज्ञाची राज्यस्तरीय निवड
10:45 AM Nov 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : जीवन ज्योती इंग्रजी माध्यम स्कूलची विद्यार्थिनी सर्वज्ञा बी. अंबोजीची राज्यस्तरीय अॅथलेटिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.जिल्हा क्रीडांगणावर नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय 17 वर्षाखालील अॅथलेटिक स्पर्धेत सर्वज्ञाने 200 मी व 400 मी धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक पटकविले आहे.सर्वज्ञाची राज्यस्तरीय अॅथलेटिक स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली आहे.तिला शाळेचे मुख्याधापक व क्रीडा शिक्षक मोईज मुल्ला यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे.
Advertisement
Advertisement