महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सरवडेत भीषण आगीत राहते घर जळून खाक! संसारोपयोगी साहित्याची राख; सुमारे २० लाख रुपयांची हानी

02:44 PM Jan 02, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

सरवडे प्रतिनिधी

येथील शामराव महादेव केसरकर यांच्या उंदरवाडी हद्दीत असलेल्या राहत्या घराला विजेच्या शाॅर्टसर्किटने आग लागून संसार साहित्यासह घर जळून खाक झाले. यामध्ये सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हि घटना रात्री दहाच्या सुमारास घडली.पहाटेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते.शेतकरी कुटुंबाचे संपूर्ण साहित्य जळाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

रात्री दहाच्या सुमारास अचानक शाॅर्टसर्किट होवून घरात आग लागली. यावेळी घरात कोणी नव्हते. मात्र बाहेर गेलेले शामराव केसरकर परत आल्यानंतर त्यांना आग लागल्याचे लक्षात आले. परंतु आगीचे रूप रौद्र असल्याने संपूर्ण घराला आगीने वेढले. त्यामुळे कोणाला काही करता येईना. बिद्री,हमीदवाडा साखर कारखाना व मुरगूड नगरपालिकेचे अग्निशमन बंब तात्काळ दाखल झाले परंतु अगोदरच घरातील वैरण, जळण,धान्य, जनावारांचे खाद्य, रोख रक्कम यासह घरातील संपूर्ण साहित्य जळून नष्ट झाले. ग्रामस्थ, युवकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. घटनास्थळी सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे.

Advertisement

Advertisement
Next Article