सरसंघचालक डॉ.मोहन भागवत बेळगावात दाखल
11:20 AM Aug 01, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे बुधवारी रात्री बेळगावात दाखल झाले. गुरुवार दि. 1 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या हिंदवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिराच्या शताब्दी महोत्सवात भाग घेण्यासाठी ते बेळगावला आले आहेत. नागपूरहून विशेष विमानाने डॉ. मोहन भागवत बेळगावला आले आहेत. त्यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सांबरा विमानतळावर स्थानिक नेते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. गुरुवारी होणाऱ्या शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article