For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

३ आपत्य असल्याने टाकळी- सिकंदर ग्रामपंचायतीचे सरपंच अपात्र

06:12 PM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
३ आपत्य असल्याने टाकळी  सिकंदर ग्रामपंचायतीचे सरपंच अपात्र
Advertisement

पाटकुल प्रतिनिधी

मलिकपेठ प्रतिनिधी:मोहोळ तालुक्यातील टाकळी (सिकंदर) या गावचे सरपंच आणि एक सदस्य यांना ३ अपत्ये असल्याच्या कारणावरून अपात्र ठरविण्यात आले असून यामुळे तेथील स्थानिक राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निकालामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी टाकळी सिकंदर येथील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते पंकज सौदागर चव्हाण   यांनी १६ मार्च २०२१ रोजी तक्रार दाखल केली होती.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षी टाकळी ग्रामपंचायतची निवडणूक झाली. या ग्रामपंचायतीमध्ये १५ सदस्य आहेत. त्यामध्ये पंचायत समितीचे माजी सदस्य ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या गटाचे ७ जण तर भीमा वसेकर यांच्यासह आणि तिसऱ्या आघाडीचे ६ जण आणि भाजपाचे मोहोळ तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण यांचे २ सदस्य निवडून आले होते.त्यानंतर यामध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या आणि सुनील चव्हाण यांच्या गटातील एक सदस्य फुटून माऊली चव्हाण यांच्याकडे गेल्यामुळे त्यांच्या गटाचे तुकाराम धर्मराज चव्हाण हे सरपंच पदी विराजमान झाले.

दरम्यान, सरपंच तुकाराम चव्हाण आणि ग्रामपंचायत सदस्य आशाबाई आप्पासाहेब चव्हाण या दोघांनाही प्रत्येकी ३ अपत्य असल्याची माहिती पुढे आली. त्यासंबंधीची तक्रार जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे दाखल करण्यात आली. याविरोधात ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी मे २०२३ मध्ये लाक्षणिक उपोषणही केले होते. त्यानंतर आशाबाई चव्हाण यांना १३ ऑक्टोबर २०२३ रोजी अपात्र ठरवण्यात येऊन विद्यमान सरपंच तुकाराम चव्हाण यांच्य़ा सदस्य अपात्रतेचा निकाल ११ मार्च २०२४रोजी देण्यात आला.

Advertisement

Advertisement
Tags :

.