महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बाणस्तारी मार्केट प्रकल्पावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरपंच दामोदर नाईक प्रयत्नशील

12:36 PM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /माशेल

Advertisement

बाणस्तारी येथे सुसज्ज मार्केट प्रकल्प उभारल्यानंतरही व्यापाऱ्यांनी बेशिस्तपणे कारभार चालविलेला आहे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नुकतीच भोम-अडकोण पंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि पंचसदस्यांनी बाणस्तारी बाजाराला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्यासमवेत पंचायतीचे सचिव पलाश भेंब्रे उपस्थित होते. यावेळी बोलताना सरपंच दामोदर नाईक म्हणाले की व्यापाऱ्यांनी त्यांना मापून दिलेल्या जागेचा योग्य उपयोग होतो की नाही याविषयी सखोल चर्चा केली.  नूतन मार्केट शेडमध्ये काहीनी दोन-तीन जागा व्यापल्या आहे त्यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासंबंधी उपाययोजना आखण्यात येणार आहे. महसुल वाढीसाठी उपाययोजना करताना सोपो गोळा करणाऱ्यांना काही व्यापारी सोपो कर देत नसल्याच्या तक्रारी होत्या त्यांना सोपो कर देण्यास  आदेश दिलेले असून अशीच पुनरावत्ती झाल्यास योग्य कारवाई करण्यात येईल अशी सक्त ताकीद दिली.  रस्त्याच्या कडेला वाहतूकीस अडथळा ठरणाऱ्या फळ व भाजी विक्रेत्यांना नजर ठेवण्यात येणार आहे.

Advertisement

व्यापाऱ्याच्या पिकअप व इतर वाहने रस्त्याच्या कडेला ठेवत असल्यानेही वाहतुकीची कोंडीवर उपाययोजना करण्यात येईल. विक्रेत्यांना नागरिकांना अडथळा ठरणाऱ्या रस्त्याच्या कडेला न बसता व्यवस्थित बसण्याचे आदेश दिले. कोट्यावधी रुपये खर्चुन बांधण्यात आलेल्या मार्केट प्रकल्पात पार्कींग व्यवस्था असून पार्कींगकडे जाणाऱ्या रस्त्यावर व्यापारी  बसत असल्याने पार्कींग स्थळावर पोचता येत नाही. अडथळा ठरणाऱ्या वाहनांना हटविण्यात येईल.  मार्केटमधील सुविधा व्यवस्थित व्यापाऱ्यांना मिळवणे, मार्केटात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सुचना करण्यात आल्या. गुरुवार, शुक्रवार असे दोन दिवस हा आठवडी बाजार चालू असून या दोन दिवसात व्यापाऱ्याने मित्रत्वाच्या भावनेने एकमेकांशी समंजसपणे वागावे व कुठल्याही प्रकारची तक्रार होऊ देऊ नका असे आवाहन केले. सरकारकडून करोडो रुपये खर्चून हा मार्केटप्रकल्प बांधला असून व्यापाऱ्यांनी बाजाराचे काम सुरळीत चालू ठेवल्यास सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी सपरंच दामोदर नाईक, उपसरपंच शैला नाईक, पंच मिताली फडते, प्रतिमा फडते गावकर, अब्दूल खान व सुनील जल्मी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article