सरगम कौशलने जिंकला ‘मिसेस वर्ल्ड 2022’चा किताब
11:40 AM Dec 24, 2022 IST | Rohit Salunke
Advertisement
तब्बल २१ वर्षाने भारताने मिसेस वर्ल्ड हा किताब जिंकला आहे. सरगम कौशल मिसेस वर्ल्ड 2022 ची विजेती ठरली. ही स्पर्धा अमेरिकेत पार पडली. स्पर्धेच्या अंतिम फेरीत बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी धडक मारली. पण सरगमने किताबावर आपले नाव कोरले.
Advertisement
सरगम कौशल असे नाव पुकारताच ती मंचावर भावूक झाली. सोशल मीडियावर सरगमचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सरगमला देश विदेशातील सेलिब्रिटींकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.
सरगम कौशल ही मूळची जम्मू-काश्मीरची असून ती शिक्षिका आणि मॉडेल आहे. 2018 मध्ये सरगमचं लग्न झाले. लग्नानंतरही तिने सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला.
याआधी तिने मिसेस इंडिया 2022 चा किताबही आपल्या नावावर केला होता.
Advertisement
2001 मध्ये अदिती गोवित्रीकरने मिसेस वर्ल्डचा किताब जिंकत भारताची मान उंचावली होती.
Advertisement