For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरबज्योत, सुरुची विजयी

06:24 AM Mar 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
सरबज्योत  सुरुची विजयी
Advertisement

वृत्तसंस्था/ भोपाळ

Advertisement

येथे झालेल्या राष्ट्रीय रायफल-पिस्तुल नेमबाजी निवड चाचणी स्पर्धेत शेवटच्या दिवशी भारताचे नेमबाज सरबज्योत सिंग आणि सुरूची यांनी अनुक्रमे पुरूष आणि महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल टी-4 प्रकारात पहिले स्थान मिळविले. सदर स्पर्धा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोटा पद्धतीकरीता महत्त्वाची समजली जाते.

पुरूषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत सरबज्योत सिंगने 244.8 गुणासह पहिले स्थान मिळविताना नौदलाच्या कुणाल राणाला मागे टाकले. कुणाल राणाने 243.9 गुणासह दुसरे तर गुरूप्रित सिंगने 222.6 गुणासह तिसरे स्थान मिळविले.

Advertisement

महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत हरियाणाची नेमबाज सुरूचीने 242.8 गुणासह पहिले स्थान घेतले. हरियाणाच्या सुरभी रावने दुसरे स्थान तर पालकने तिसरे स्थान मिळविले. अलिकडेच सुरूचीने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळविले होते.

Advertisement
Tags :

.