'सारथी'च्या विद्यार्थ्यांचे प्रश्न दोन दिवसात मार्गी लावणार- मनोज जरांगे- पाटील
कोल्हापूर दौऱ्यावर असताना मनोज जरांगे- पाटील यांची सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी भेट घेतली. आपल्या व्यथा मांडताना सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप नोंदणी दिनांकापासून मिळण्याबाबतचे निवेदन दिले. त्यावेळी जरांगे पाटील यावेळी जरांगे पाटील यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न एकूण याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे सांगितले आहे.
संशोधक विद्यार्थ्यांची नोंदणी दिनांकापासून सरसकट फेलोशीप मिळावी अशी मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची सारथीच्य़ा विद्यार्थ्यांनी भेट घेतली. संशोधक विद्यार्थ्यांना मिऴणारी फेलोशीप सरसकट सर्वाना द्यावी तसेच ती नोंदणी झालेल्या दिनांकापासूनच द्यावी अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रश्नी आपण सरकारशी बोलावे अशी विनंती केली.
यावर मनोज जरांगे पाटील यांनी, मी सातत्याने सर्वांचा प्रश्न मार्गी लावत आलोय. सारथी पीएचडी विद्यार्थ्यांचाही प्रश्न दोन दिवसात मार्गी लावतो, या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी स्वतः बोलेन...मी तुमच्यासाठीच लढतोय अशी प्रतिक्रिया दिली.
यावेळी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळात सौरभ पवार, अभय गायकवाड, संभाजी खोत, प्रियांका पाटील, सुहास रोमणे, सुनिता अडसूळ, मयूर भारमल, रोहित चव्हाण,दिपाली पाटील, प्रतीक्षा डोंगरे, योगेश पाटील, सनदकुमार खराडे, वैभवी पाटील, नम्रता घाटगे, गणेश माळी, सुशांत बोरनाक, अमृता पाटील, तेजश्री जाधव, प्रज्ञा पाटील आदी विद्यार्थी उपस्थित होते.