महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सारस्वत बोर्डिंग-विकास मंडळातर्फे स्मशानभूमीसाठी 60 हजार शेणी दान

11:12 AM Feb 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
Saraswat Boarding-Development Board
Advertisement

कोल्हापूर : महापालिकेच्या मोफत अंत्यसंस्कार उपक्रमाला हातभार लावताना श्री सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह व सारस्वत विकास मंडळ यांनी संयुक्तपणे साठ हजार शेणी दान केल्या. येत्या काही दिवसात आणखी चाळीस हजार शेणी दान करण्यात येणार असल्याचे सारस्वत विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन जनवाडकर व वसतिगृहाचे संचालक सचिन शानबाग यांनी सांगितले.

Advertisement

कोल्हापूर महापालिकेतर्फे मृतदेहावर मोफत अंत्यसंस्कार केले जातात. सामाजिक भावनेच्या उद्देशाने महापालिका हा उपक्रम राबविते. महापालिका मोफत अंत्यसंस्कारासाठी दरवर्षी लाखो रुपयेंची तरतूद करते. दरम्यान अंत्यसंस्कार विधीसाठी शेणी अत्यावश्यक आहेत. काही वेळेला शेणींचा तुटवडा जाणवतो. महापालिकेतर्फे नागरिकांना शेणी दान करण्याविषयी आवाहन केले जाते. महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत सारस्वत बोर्डिंग व सारस्वत विकास मंडळाने एक लाख शेणी दान करण्याचे ठरविले आहे.

Advertisement

यासाठी बोर्डिंगचे अध्यक्ष मोहन देशपांडे, उपाध्यक्ष सिद्धार्थ लाटकर व सारस्वत विकास मंडळाचे अध्यक्ष जनवाडकर यांनी निधी जमा करण्यासंबंधी आवाहन केले. समाज बांधवांनी त्या आवाहनाला प्रतिसाद दिला. जवळपास पन्नास हजार रुपये जमले. त्या निधीतून महापालिकेकडे आतापर्यंत साठ हजार शेणी दान केल्या. सचिन जनवाडकर, अमित सलगर, शंतनू पै, मुकुंद गुंजीकर, हर्षांक हरळीकर, अवधूत जोशी, सचिन शानबाग यांनी पंचगंगा स्मशानभूतील व्यवस्थापनाकडे या शेणी सुर्पदू केल्या.

सारस्वत विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन जनवाडकर म्हणाले, ‘ सारस्वत बोर्डिंग व विकास मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या मोफत अंत्यसंस्कार उपक्रमाला मदत म्हणून या शेणी दान केल्या आहेत. बोर्डिंग, विकास मंडळ व समाजबांधवांनी सहकार्य केले.”

प्रत्येक नागरिकांनी तरतूद करावी….
सारस्वत बोर्डिंगचे संचालक सचिन शानबाग यांनी, ‘मनुष्य हा वाढदिवस, विवाह सोहळा व अन्य समारंभासाठी खर्चाची तरतूद करतो. विविध कार्यक्रमात पैसे खर्च करतो. आपल्या जीवनासाठी पैशाची, मालमत्तेची तयारी करुन ठेवतो. कोल्हापूर ही दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. प्रत्येक नागरिकांनी व्यापक विचार करुन महापालिकेच्या मोफत अंत्यसंस्कार उपक्रमासाठी मदत करण्याची भावना अंगी रुजविली पाहिजे. मरणोत्तर होणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी हयात असताना आपणच तरतूद करायला हवी. त्यानुसार अंत्यसंस्कारासाठी जे आवश्यक साहित्य आहे त्याच्या खर्चाचा भार महापालिकेवर पडू नये यासाठी शक्य होईल तितकी मदत प्रत्येक नागरिकांनी करावी. जेणेकरुन महापालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या मोफत अंत्यसंस्कार उपक्रमात कसल्या अडचणी निर्माण होणार नाहीत. जे सधन आहेत त्यांनी आवर्जून हातभार लावावा. त्यामुळे सामान्य कुटुंबांला आर्थिक झळ सोसावी लागणार नाही.

Advertisement
Next Article