महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

साराचा चित्रपट 21 मार्चला प्रदर्शित होणार

06:18 AM Feb 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘ऐ वतन मेरे वतन’ चित्रपटात मुख्य भूमिका

Advertisement

प्रसिद्ध स्टार किड आणि अभिनेत्री सारा अली खानने कमी काळात चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण पेले आहे. सारा आगामी काळात देशभक्तीवर आधारित चित्रपटात स्वत:ची अभिनयक्षमता दाखवून देणार आहे. साराचा चित्रपट  ‘ऐ वतन मेरे वतन’च्या ओटीटीवरील प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे.

Advertisement

दिग्दर्शक कन्नन अय्यर यांच्या दिग्दर्शनात निर्माण या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. बॉलिवूडचा दिग्गज निर्माता करण जौहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सारासाठी हा चित्रपट अत्यंत खास ठरणार आहे.  ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओने ऐ वतन मेरे वतन चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केला आहे. तसेच हा चित्रपट 21 मार्च रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे.

या चित्रपटात सारा ही स्वातंत्र्यसेनानीची भूमिका साकारत आहे. स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय भूमिका बजावणाऱ्या उषा मेहता यांच्या व्यक्तिरेखेत ती दिसून येणार आहे. अशाप्रकारची भूमिका सारा पहिल्यांदाच साकारत असल्याने तिच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article