महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नीता अंबानींकडून सरबजोतचा सत्कार

06:43 AM Aug 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / पॅरिस

Advertisement

ऑलिंपिक क्रीडामहोत्सवात पिस्तुल नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सरबजोत सिंग याने मनु भाकर हिच्यासमवेत मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातली. या त्याच्या यशामुळे भारतीय ऑलिंपिक समितीच्या सदस्या आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी येथे बुधवारी सिंग याचा सत्कार केला आहे. हा सत्कार त्यांनी पॅरिसमधील ‘इंडिया हाऊस’ येथे केला. पॅरिसच्या ऑलिंपिक नगरीत प्रथमच यावेळी ‘इंडिया हाऊस’ची स्थापना करण्यात आली आहे. या सत्कार समारंभाला भारताचे इतर खेळाडूही उपस्थित होते.

Advertisement

या कार्यक्रमात नीता अंबानी यांनी पदकविजेत्या भारतीय खेळाडूंच्या सन्मानार्थ भाषण केले. या खेळाडूंनी देशाची शान वाढविली. आज या कार्यक्रमात या क्रीडा महोत्सवात भाग घेणारे सर्व भारतीय खेळाडू उपस्थित आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे. क्रीडा क्षेत्रात कोणीही हरणारा नसतो, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून त्याची प्रचीती आपल्या सर्वांना आलेली आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी खेळाडूंचा गौरव केला.

दक्षिण कोरियाच्या नेमबाजांचा केला पराभव

मनू भाकर आणि सरबजोतसिंग यांनी उपउपांत्य फेरीत दक्षिण कोरियाच्या ली वोन्हो आणि ओह ये जीन या जोडीचा 16-10 असा पराभव करुन कांस्यपदक जिंकले होते. या स्पर्धेत भारताच्या दोन्ही खेळाडूंनी उच्च दर्जाच्या नेमबाजीचे प्रदर्शन करुन अनेकदा अचूक लक्ष्यभेद केला आणि 10 पैकी 10 गुण मिळविले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article