For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार्तिकसोबत पुन्हा झळकणार सारा

06:38 AM Dec 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
कार्तिकसोबत पुन्हा झळकणार सारा
Advertisement

अनीस बाजमी यांच्या दिग्दर्शनात तयार ‘भूल भुलैया’ आणि भूल भुलैया2’ हे चित्रपट यशस्वी ठरले होते. पहिल्या चित्रपटात अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली होती. तर दुसऱ्या चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत होता. या फ्रेंचाइजीच्या तिसऱ्या चित्रपटात कार्तिक आर्यन मध्यवर्ती भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत सारा अली खान दिसून येणार असल्याचे वृत्त आहे. यावेळी मंजुलिकाच्या भूमिकेत तब्बू दिसून येणार नसल्याचे मानले जात आहे. भूल भुलैया 2 या चित्रपटातील मंजुलिकाच्या भूमिकेकरता तब्बूचे कौतुक झाले होते.  या नव्या चित्रपटाच्या पटकथेला अंतिम स्वरुप देण्यात आले आहे. फ्रेंचाइजीच्या तिसऱ्या चित्रपटासाठी सारा अली खानच्या नावाचा विचार निर्मात्यांनी चालविला आहे. हा चित्रपट पुढील वर्षी दिवाळीवेळी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. कार्तिक आणि सारा हे यापूर्वी ‘लव आज कल’ या चित्रपटात एकत्र दिसून आले होते. सारा आणि कार्तिकने परस्परांना डेट देखील केले आहे. लव आज कल या चित्रपटानंतर त्यांचा ब्रेकअप झाला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.