For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सारा-अनन्या पांडे एकत्र

07:00 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
सारा अनन्या पांडे एकत्र
Advertisement

सारा अली खान आणि अनन्या पांडे या दोघीही चर्चित स्टारकीड्स आहेत. सैफ अली खान आणि चंकी पांडे या अभिनेत्यांच्या या मुलींमध्ये चांगली मैत्री देखील आहे. या दोघींमधील केमिस्ट्री अलिकडेच कॉफी विथ करण 8’ या शोमध्ये दिसून आली होती. या दोन्ही अभिनेत्री आता चित्रपटात एकत्र दिसून येणार आहेत. एका प्रॉडक्शन हाउसबाहेर दोघीही दिसून आल्या आहेत. या दोन्ही अभिनेत्री ‘कॉकटेल 2’ या चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा आहे. दोघींनाही एका प्रॉडक्शन हाउसमध्ये एकत्र पाहिले गेले आहे. एका व्हायरल व्हिडिओत सारा अली खान आणि अनन्या पांडे एकाच कारमधून प्रवास करताना दिसून आल्या आहेत. अनन्या  लवकरच देसी बॉयज 2 या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. यात ती टायगर श्रॉफ आणि वरुण धवनसोबत काम करतेय. अनन्या पांडे मागील वर्षी ड्रीम गर्ल 2 आणि खो गए हम कहां यासारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर कॉकटेल हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात सैफ अली खान आणि दीपिका पदूकोन तसेच डायना पँटी यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.