कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सॅन्टीयागो नीव्हा महिला मुष्टियुद्ध संघाचे प्रशिक्षक

06:46 AM Nov 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

भारतीय महिला मुष्टीयुद्ध संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी माजी उच्च कार्यक्षमता संचालक स्विडनच्या सॅन्टीयागो नीव्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement

अर्जेंटिनात जन्मलेल्या पण स्विडनमध्ये स्थायिक झालेल्या सॅन्टीयागो नीव्हा यांनी 2017 ते 2022 या कालावधीत भारतीय पुरूष मुष्टीयुद्ध संघासमवेत कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता तर 2019 च्या पुरूषांच्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत दोन पदके भारतीय स्पर्धकांनी मिळविली होती. नीव्हा यांना तब्बल दोन दशकांचा प्रशिक्षकाचा अनुभव असल्याने त्यांच्या नियुक्तीमुळे भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांना अधिक दर्जेदार कामगिरी करण्याची संधी लाभणार आहे. सदर माहिती अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनचे अध्यक्ष अजय सिंग यांनी दिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article