Vari Pandharichi 2025: तुकोबा आज आकुर्डी मुक्कामी, काय सांगते आख्यायिका?
आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम
By : प्रशांत चव्हाण / आकुर्डी
विठ्ठलाचा वास, तुकोबांचा सहवास ।
मनी एकचि आस । पंढरीची ।।
हा भाव मनात बाळगत संतशिरोमणी तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे गुऊवारी आकुर्डीनगरीत आगमन होत आहे. तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे दुसरे मुक्कामाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात वारीदरम्यान संत तुकाराम महाराजांनीही मुक्काम केल्याची आख्यायिका आहे.
तुकोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या परिसराला म्हणून वारकरी संप्रदायामध्ये महत्त्वाचे स्थान असून, पालखीच्या स्वागतासाठी आकुर्डी ग्रामस्थ आतुरले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील जुन्या गावांमध्ये आकुर्डी गावाचा समावेश होतो. निगडी आणि चिंचवड या दोन गावांच्या मधोमध असलेल्या आकुर्डीला वारकरी संप्रदायात महत्त्वाचे स्थान आहे.
येथील विठ्ठलाचे मंदिर 400 ते 500 वर्षांपूर्वीचे असावे, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. तुकोबांच्या पालखीचा दुसरा मुक्काम येथेच असतो. येथील कुटे घराण्याकडे मंदिराचा मान असून, त्यांची आठवी, नववी पिढी मंदिराची देखभाल करीत आहे.
मंदिराचा इतिहास व स्थानमाहात्म्याबाबत अधिक माहिती देताना देवस्थानचे विश्वस्त गुलाब कुटे म्हणाले, देहू, आळंदीतून वारीसाठी निघून संत तुकाराम महाराजांनी आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरात मुक्काम केल्याचे सांगितले जाते. जिथे तुकोबारायांनी विसावा घेतला, थांबा घेतला, त्याच विठ्ठल मंदिरात दरवर्षी पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो.
पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी आता पूर्ण झाली आहे. रंगरंगोटी, मंडप उभारणी, दर्शनबारीचे काम पूर्णत्वास गेले आहे. गुऊवारी सायंकाळी पालखी सोहळा आकुर्डीत विसावणार आहे. मनपा शाळा, सोसायट्यांच्या पार्किंगसह मंडप उभारून वारकऱ्यांची सोय करण्यात आली आहे. देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रमही राबविण्यात येणार आहे.
आकुर्डीतील विठ्ठल-रखुमाईची मूर्ती वैशिष्ट्यापूर्ण आहे. काळ्या पाषाणातील ही स्वयंभू व एकत्रित स्वऊपातील मूर्ती आहे. मंदिराचे काम दगडी स्वऊपाचे आहे. ते साधारण 400 ते 500 वर्षांपूर्वीचे असावे. तर मंदिराची तटबंदी ही पेशवेकालीन आहे. पहाटेची पूजा, काकड आरती, हरिपाठ, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम मंदिरात नित्यनेमाने होतात.
मुख्य म्हणजे देवस्थानच्यावतीने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे औचित्य साधून संतांच्या वंशजांचे कीर्तनही ठेवण्यात येते, असे त्यांनी सांगितले. उद्योगनगरी स्वागतास सज्ज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे देहूहून बुधवारी प्रस्थान झाले.
गुरुवारी पहाटे पालखी आकुर्डीच्या दिशेने मार्गस्थ होईल. त्यानंतर दुपारनंतर पालखी सोहळ्याचे पिंपरी-चिंचवडनगरीत आगमन होईल. या वेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. या वेळी निगडी परिसरात भक्ती शक्तीचा संगमही भाविकांना अनुभवायला मिळेल. त्यानंतर सायंकाळी पालखी आकुर्डी मुक्कामी पोहोचेल.
वैशिष्ट्यापूर्ण मूर्ती
आकुर्डीतील विठ्ठल-रखुमाईची मूर्ती वैशिष्ट्यापूर्ण आहे. काळ्या पाषाणातील ही स्वयंभू व एकत्रित स्वऊपातील मूर्ती आहे. मंदिराचे काम दगडी स्वऊपाचे आहे. ते साधारण 400 ते 500 वर्षांपूर्वीचे असावे. तर मंदिराची तटबंदी ही पेशवेकालीन आहे. पहाटेची पूजा, काकड आरती, हरिपाठ, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम मंदिरात नित्यनेमाने होतात. मुख्य म्हणजे देवस्थानच्या वतीने वेगवेगळ्या कार्यव्रमाचे औचित्य साधून संतांच्या वंशजांचे कीर्तनही ठेवण्यात येते, असे त्यांनी सांगितले.