महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत संत मीराचे यश

10:12 AM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : दिल्ली येथील छत्रसाल स्टेडियम व प्रितमपुरा येथील सर्वोदय विद्यालयाच्या मैदानावर असलेल्या 67 व्या अखिल भारतीय राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत संत मीराच्या मुलींच्या हँडबॉल संघाने यश संपादन केले आहे. दिल्ली येथील छत्रसाल येथे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत संत मीरा शाळेचा चमू विद्याभारतीचे प्रतिनिधित्व करताना पहिल्या सामन्यात आंध्रप्रदेश विरुद्ध संत मीरा शाळेला 6-3 असा पराभव केला. संतमीरा संघाच्या मेघा कलखांबकर, मनस्वी चतुर, ऐश्वर्या पत्तार आणि प्रत्येकी 1 गोल केला. दुसऱ्या सामन्यात चंदिगडने संत मीराला  10-7 असा पराभव केला.संतमीरा तर्फे मेघा कलखांबकरने  3 गोल, मनस्वी चतुरने 2, ऐश्वर्या पत्तार व वर्षा परीटने प्रत्येकी 1 गोल केले. अखेरच्या  साखळी सामन्यात संत मीरा शाळेने आयपीएससी संघाचा 16-1 असा दारूण पराभव केला, संत मीरातर्फे ऐश्वर्या पत्तारने तीन हॅट्ट्रिकसह 10 गोल, मनस्वी चतुर व  मेघा कलखांबकर यांनी प्रत्येकी 3 गोल केले. या संत मीरा संघात गोलरक्षक भावना बेरडे, सान्वी कुलकर्णी, ऐश्वर्या पत्तार, मेघा कलखांबकर, मनस्वी चतुर वर्षा परीट, सुहानी गुदेकर, हिंदवी शिंदे, प्रणाली मोदगेकर, स्वाती फडनाडी, ऋतिका हलगेकर या खेळाडूंचा समावेश होता. संघाला  क्रीडाशिक्षिका मयुरी पिंगट, प्रशिक्षक शिवकुमार सुतार, यश पाटील, बसवंत पाटील मार्गदर्शन तर शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, ऋतुजा जाधव, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे यांचे  प्रोत्साहान लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article