संत मीरा फुटबॉल संघ उपविजेता
बेळगाव : कोडगू जिल्हा फुटबॉल संघटना व सार्वजनिक शिक्षण खाते कोडगू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगाव जिह्याचे प्रतिनिधित्व करीत अनगोळच्या संत मीरा स्कूलने उपविजेतेपद पटकाविले. मुलांच्या 17 वर्षाखालील गटातील पहिल्या सामन्यात बेळगावने म्हैसूरचा 1-0 असा पराभव केला, विजयी संघातील अब्दुल मुल्लाने गोल केला. दुसऱ्या सामन्यात बेळगावने गुलबर्गाचा 2-0 असा पराभव केला, बेळगाव संघातील ईशान देवगेकर, व बालाजी यांनी प्रत्येकी 1 गोल केला, बेळगाव व बेंगळूर यांच्यातील तिसरा सामना गोल शुन्य बरोबरीत राहिला. चौथ्या सामन्यात डीवायईएस बेंगळूर संघाने बेळगांवचा 2-1 असा पराभव केला.
मुलींच्या 14 वर्षाखालील गटातील पहिल्या सामन्यात बेळगावने कलबुर्गीचा 2-0 असा पराभव केला. बेळगाव संघाची कर्णधार निधीशा दळवी व धृती शेट्टी यांनी प्रत्येकी 1 गोल केला.तिसऱ्या सामन्यात बेळगावने बेंगळूरला 1-1 असे बरोबरीत रोखले. बेळगावच्या समिक्षा खन्नुरकरने एक गोल केला. सदर स्पर्धेतील उपविजेत्या संघातील कल्याणी हलगेकर व अद्वित्ता दळवी तर मुलांच्या गटात अब्दुल्ला, जीवधन यांची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बेळगावच्या संघातून साईराज कुराळे, ओम घुमे, अनन्या, निधीशा दळवी, समीक्षा खन्नुरकर, हर्षिता गवळी,या खेळाडूंचा समावेश होता. वरील उपविजेत्या संघाला प्रशिक्षक चंद्रकांत पाटील, शिवकुमार सुतार,अनुराधा पुरी यांचे मार्गदर्शन तर परमेश्वर हेगडे, राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दफ्तरदार, ऋतुजा जाधव प्रोत्साहान लाभत आहे.