For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्य ऍथलेटिक स्पर्धेत संत मीराचे यश

10:22 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्य ऍथलेटिक स्पर्धेत संत मीराचे यश
Advertisement

बेळगाव : बिदर येथे विद्याभारती कर्नाटक आयोजित विद्याभारती बिदर जिल्हा पुरस्कृत राज्यस्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेत संत मीरा शाळेच्या खेळाडूंनी 2 सुवर्ण 3 रौप्य 1 कांस्यपदकसह एकुण 6 पदके पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली. बिदर येथे झालेल्या या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या गटात नताशा चंदगडकरने लांब उडी व तिहेरी उडीत 2 सुवर्णपदक, समीक्षा बुद्रुकने 3000 मी. धावणे रौप्य, मनस्वी चतुरने थाळीफेक रौप्य, भावना बेर्डेने 100 मी. धावणे रौप्य, साक्षी राजाराम पाटीलने 3 किलो मी. चालणे कांस्यपदक पटकाविले. वरील खेळाडूंची गुंटूर विजयवाडा येथे 14 व 15 सप्टेंबर रोजी होणाऱ्या विद्याभारती क्षेत्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे यासाठी हा संघ गुऊवार तारीख 12 रोजी हुबळी मार्गे विजयवाड्याला क्रीडा शिक्षिका मयुरी पिंगट, आनंद कुलकर्णी यांच्यासह रवाना होत आहे. या संघाला क्रीडाशिक्षक सी.आर. पाटील, मयुरी पिंगट, यश पाटील, शिवकुमार सुतार यांचे मार्गदर्शन तर शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव व पालक वर्गांचे प्रोत्साहान लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.