अनगोळचा संत मीरा संघ अंतिम फेरीत
बेळगाव : माळमारुती येथील लव्हडेल स्कूलच्या टर्फ मैदानावर मानस फुटबॉल अकादमी आयोजित झेवियरेट चषक आंतर शालेय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत उद्घाटनाच्या दिवशी संत मीरा-अनगोळ स्कूलने अंतिम फेरीत प्रवेश केला तर सेंट जोसेफ, सेंट झेवियर्स स्कूलने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत सेंट जोसेफ स्कूलने जैन हेरिटेजचा 3-0 असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. विजयी संघातील धृती शेट्टीने 2 गोल, जियाने 1 गोल केला तर पहिल्या उपांत्य सामन्यात संत मीराने उळागड्डी खानापूरचा 3-0 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. विजयी संघातर्फे निधीशा दळवीने 2 तर समिक्षा खन्नुरकरने एक गोल केला. स्पर्धेच्या उद्घाटनला प्रमुख पाहुणे प्राचार्य फादर अँड्रीयो फिलिप्स, डॉ. रूक्सार वाटंगी, नौशाद जमादार, मानस नायक, मॅन्युअल डिक्रुझ, आयान किल्लेदार यांना खेळाडूंची ओळख करुन देण्यात आली. त्यानंतर त्यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. याप्रसंगी इमान बंदार, किरण के., अमन सय्यद, ताहीर बेपारी, आदर्श गणेशकर, वसुंधरा चव्हाण, किंजल जाधव, साक्षी चिटगी, श्रावणी सुतार, प्रांजल हजारे, श्रद्धा पाटील, सेजल, तेजल हंसी उपस्थित होते.