जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धत संत मीरा, बालिका आदर्श, चिटणीस विजेते
बेळगाव : टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा, बालिका आदर्श, जी जी चिटणीस शाळेने बेळगाव ग्रामीणचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डिव्हाईन मर्सी, व पब्लिक स्कूल यांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत अनगोळ येथील संत मीरा शाळेच्या मैदानावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्राथमिक मुलींच्या गटातील अंतिम लढतील बालिका आदर्शने पब्लिक स्कूल शिंदोळीचा 11-0 असा पराभव केला, बालिका तर्फे आदिती मोरेने 5, शिवानी शेलार 3, समृद्धी पाटील 2, सेजल धामणेकर 1 गोल केला मुलांच्या गटातील अंतिम लढतीत जी. जी. चिटणीस शाळेने डिवाईन मर्सीचा 3-1 असा पराभव केला. चिटणीस तर्फे साईश कदमने 1, कृष्णा गौडाडकरने 2 गोल केले, मर्सीं तर्फे मुबारक बडेघरवालेने 1 गोल केला.
माध्यमिक मुलींच्या अंतिम लढतीत बालिका आदर्शने डिव्हाईन मर्सीचा 10-3 असा पराभव केला. बालिका तर्फे सेजल जाधवने 6 गोल, स्वानंदी पावलेने 2 गोल तर वैष्णवी नावगेकर, ऋतुजा सुतार यांनी प्रत्येकी 1 गोल केले. मर्सी संघातर्फे अनुश्री एलजी, अनुष्का बेळगावकर, स्नेहा मेटी यांनी प्रत्येकी 1 गोल केले. मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने डिव्हाईन मर्सीचा 3-2 असा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. संत मीरातर्फे सोहेल बिजापुरे, अनिऊद्ध हलगेकर, वेदांत गुरव, यांनी प्रत्येकी 1 गोल केले, मर्सी संघातर्फे योगेश भातकांडे, वेदांत हंगी यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे क्रीडाभारतीचे राज्यसचिव ए.बी. शिंत्रे, आर. पी. वंटगुडी, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, एन. ओ. डोणकरी, विवेक पाटील, सुरेश कळ्ळेकर, मंजुनाथ गोलीहाळ्ळी, सुनिता जाधव, या मान्यवरांच्या हस्ते विजेते विजेत्या संघांना प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी नारायण पाटील, शिवकुमार सुतार, यश पाटील, मयुरी पिंगट, जयसिंग धनाजी, बापू देसाई, उमेश मजुकर, प्रवीण पाटील, सचिन कुडची, नागराज भगवंतण्णावर, सी. आर. पाटील. प्रकाश बजंत्री, सुनील बेळगुंदकर, आनंद पाटील, पी. एस. कुरबेट, चिंतामणी, डॉ. बुलबुले, देवेंद्र कुडची, वाय. सी. गोरल, नितीन नाईक, महावीर जनगौडा, शामल दड्डीकर, प्रीती कोलकार, सीमा कामत, चंद्रकांत तुर्केवाडी, बसवंत पाटील, उपस्थित होते.