For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Vari Pandharichi 2025: तरडगाव येथे उभ्या रिंगणानंतर वारकऱ्यांचा उत्साह दुणावला

03:17 PM Jun 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
vari pandharichi 2025  तरडगाव येथे उभ्या रिंगणानंतर वारकऱ्यांचा उत्साह दुणावला
Advertisement

वारकऱ्यांची पावले झपाझप श्रीरामनगरी अर्थात फलटणच्या दिशेने पडू लागली

Advertisement

By : रमेश आढाव

फलटन : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचा एक दिवसाचा मुक्काम तरडगाव येथे होता. शनिवारी सकाळी सोहळा तरडगावातून फलटणकडे रवाना झाला. दरम्यान, चांदोबाचा लिंब येथे सोहळ्यातील पहिले उभे रिंगण उत्साहात पार पडले. त्यानंतर वारकऱ्यांची पावले झपाझप श्रीरामनगरी अर्थात फलटणच्या दिशेने पडू लागली.

Advertisement

हरिनामाचा गजर करीत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याने एक दिवसाच्या मुक्कामासाठी फलटण नगरीच्या दिशेने आगेकूच केली. हरिनामाच्या गजरात पुन्हा नवा उत्साह घेऊन वारकऱ्यांनी आपल्या दिंड्या नंबरप्रमाणे लावून विठुरायाच्या जयघोषात तरडगावच्या पुढे मार्गस्थ केल्या.

टाळ, मृदुंग, हरिनामाचा गजर करीत पालखी सोहळा काळजमध्ये आल्यानंतर या परिसरातील भाविकांच्या दर्शनासाठी माउलींची पालखी दत्त मंदिर परिसरात थांबविण्यात आली. पालखी सोहळा पुढे काळज येथून सुरवडीकडे विश्रांतीसाठी मार्गस्थ झाला.

पालखी सोहळा सुरवडीत आल्यानंतर ग्रामपंचायतच्या वतीने ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, सरपंच सौ. शरयु जेतेंद्र साळुंखे पाटील यांच्या हस्ते पालखी सोहळ्यातील प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. सुरवडी, साखरवाडी, जिंती परिसरातील नागरिकांनी माउलींच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

सुरवडीनंतर पालखी सोहळा निंभोरेत दुपारच्या विसाव्यासाठी थांबला. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या शेतांमध्ये सावली, पाण्याची व्यवस्था पाहून महिला भगिनींनी स्वंयपाकास सुरुवात केल्याचे चित्र होते. दरम्यान, या परिसरात ठिकठिकाणी वैष्णवजन जेवणाचा आस्वाद घेत होते.

जेवणानंतर संतश्रेष्ठ माउलींचा पालखी सोहळा फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाच्या दिशेने मार्गस्थ झाला. सोहळ्याचे दूध संघ परिसरात आल्यानंतर पालखी सोहळ्याचे दूध संघाच्यावतीने चेअरमन धनाजी पवार, डी. के. पवार यांनी स्वागत केले.

Advertisement
Tags :

.