Solapur News : सीना नदीच्या पूरामुळे संजवाड-औराद रस्ता तिसऱ्यांदा बंद !
पूरग्रस्त भागांची डॉ. चंनगोंडा हवीनाळे यांच्याकडून पाहणी
दक्षिण सोलापूर : सीना नदीला पुन्हा पुन्हा पूर आला असून संजवाड-औराद तिसऱ्यांदा रस्ता बंद करण्यात आला आहे. सलग दोन दिवसापासून आणखीन पुलावर पाणी आहे. तसेच नुकसान झालेल्या भागाची पाहणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. चंनगोंडा हवीनाळे यांनी केली.
नदीकडच्या अनेक गावांमध्ये मातीची धूप मोठ्या प्रमाणात झाली आहे. आपण यासाठी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीषा देशमुख यांच्या सहकार्यांनी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. चंनगोंडा हवीनाळे यांनी सांगितले.
विशेष म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात एकाच वर्षात सलग २५ दिवसात फक्त दोन दिवस रस्ता खुला होता, ही पहिलीच वेळ आहे. संजवाड-औराद पुलावर सध्या सुमारे तीन फूट पेक्षा जास्त पाणी आहे. दोन दिवसांपूर्वीच संजय भागाण्णा दशंवत (रा. संजवाड) हा तरुण वाहून गेलेला होता. सीना नदीच्या दोन्ही काठावरती अनेक तरुण असल्यामुळे प्रसंगाअनावधाने या तरुणाचे प्राण वाचले आहे.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती संदीप टेळे, सरपंच शशिकांत बिराजदार, माजी उपसरपंच अरविंद शेतसंदी, औरादचे पोलीस पाटील सैपन बेगडे,कुमट्याचे पाटील, सोसायटीचे संचालक तायाप्पा दुधाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.