लँड माफियांचे फोटो संजू परबांनी दाखवावेत - मंत्री केसरकर
सावंतवाडी | प्रतिनिधी
आंबोली , गेळे या जमिनीच्या वाटपाचा प्रश्न जवळपास संपुष्टात आला आहे. आता चौकुळ गावच्या जमीन वाटपाचा प्रश्नही निकाली काढला आहे. तिन्ही गावच्या जमिनीत वाटपाबाबत आचारसंहितेपूर्वी कार्यवाही केली जाणार आहे. आंबोली येथील वहिवाटीच्या जमिन वाटपाबाबत स्थानिक कमिटीला निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच हा प्रश्न कायमचा सुटणार आहे. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्नही लवकरच सोडवला जाईल. सावंतवाडी एसटी बस स्थानक बीओटी तत्त्वावर आता उभारले जाणार आहे. त्यासाठी नवनियुक्त अध्यक्ष गोगावले यांना सावंतवाडीत आणण्यात येणार आहे. तिलारी येथील वन टाइम सेटलमेंट केले जाईल अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सासोली जमिनीचा प्रश्न मी लवकरच सोडवणार आहे. लँड माफिया कोण आहेत त्यांचे फोटो माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दाखवावेत असेही ते म्हणाले जे झोपेचे सोंग घेत आहेत त्यांना जागे करता येत नाही मात्र झोपलेल्याना उठवता येतं . मात्र जे काहीच करत नाहीत आणि फक्त वृत्तबाजी करतात असे माजी आमदार राजन तेली आहेत अशी टीका केसरकरांनी पत्रकार परिषदेत केली .