महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संजीवनी पुढील वषी सुरू

12:02 PM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आश्वासन : इथेनॉल प्रकल्पासाठीही निविदा जारी,आश्वासनांनंतर शेतकऱ्यांच आंदोलन मागे

Advertisement

पणजी : अखेर गोमंतक ऊस शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी काल मंगळवारी येथील शासकीय निवास्थानी भेट झाली. यावेळी संजीवनी साखर कारखाना पुढील वर्षापासून सुरू करणार तसेच यंदाचे आणि पुढच्या वर्षाचे पैसे शेतकऱ्यांना देण्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली. ऊसाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना परवानगी द्या, असेही कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी ही आश्वासने दिल्यानंतर येथील आझाद मैदानावर सुरु असलेले धरणे आंदोलन ऊस शेतकऱ्यांनी मागे घेतले. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात दयानंद फळदेसाई, राजू देसाई, मास्कारेन्हास, रिमा गावकर व अन्य काहीजण उपस्थित होते. यावेळी कृषी खात्याचे संचालक व अन्य अधिकारीही उपस्थित होते. शिष्टमंडळाने आपले प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संजीवनी साखर कारखाना सुऊ करण्याची हमी दिली.

Advertisement

सोमवारी पणजीत धरणे

संजीवनी साखर कारखाना सुरू करण्याबाबत सरकारने स्पष्टीकरण न दिल्यामुळे ऊस उत्पादकांनी प्रथम संजीवनी साखर कारखान्याच्या परिसरात आंदोलन सुरू केले होते. परंतु, सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्याने त्यांनी सोमवारी पणजीतील आझाद मैदानावर येऊन धरणे आंदोलन सुरू केले होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत जोपर्यंत कारखाना सुरू करण्याबाबत आम्हाला भेटून स्पष्टीकरण देत नाहीत, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता.

मुख्यमंत्र्यांनी काढला तोडगा

सोमवारी दिवसभर सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे विरोधी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, रिव्हॉल्युशनरी गोवन्स या पक्षांनी ऊस उत्पादकांची भेट घेऊन सरकारवर टीकास्र सोडले होते. अखेर मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी मंगळवारी सकाळी बैठक घेऊन कारखाना पुढील वर्षापासून सुरू करण्याची हमी दिली. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.

तीन महिन्यांत कंत्राटदाराची नेमणूक

इथेनॉल प्रकल्पासाठी संजीवनी साखर कारखाना बंद करण्यात येईल. परंतु, शेतऱ्यांना पुढील पाच वर्षे त्यांच्या ऊसाचा मोबदला देण्यात येईल, अशी हमी सरकारने दिलेली होती. त्यानुसार, ऊस उत्पादकांना आतापर्यंत 30 कोटी ऊपये सरकारने दिलेले आहेत. इथेनॉल प्रकल्पासाठी पुढील तीन महिन्यांत कंत्राटदार नेमून कारखाना पुढील वर्षापासून सुरू केला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनाही ऊसाची लागवड करण्यास आपण सांगितले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

इथेनॉल प्रकल्पासाठी निविदा जारी

संजीवनी कारखान्यात इथेनॉल प्रकल्प उभारण्याबाबत सरकारने आरएफक्यू निविदा जारी केली आहे. ‘पीपीपी’ विभागाने याबाबतची निविदा जारी केली असून, निविदा भरण्यासाठी 1 मार्च 2024 ही अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे. याआधीही ‘पीपीपी’ने निविदा जारी केली होती. त्यावेळी दोन एजन्सी आलेल्या होत्या. परंतु, त्यांच्याकडे अनुभव नसल्यामुळे त्यांना संधी देण्यात आली नव्हती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article