मराठा आरक्षणावरून मंत्रिमंडळामध्ये गँगवार! संजय राऊतांचा मोठा खुलासा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकार आणि मराठा आंदोलकांमध्ये राजकीय युद्ध पेटले असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याच मुद्द्यावरून सरकारला घेरले आहे. मराठा आरक्षणावरून मंत्रिमंडळात गँगवार सुरू असून राज्यातील संपूर्ण परिस्थिती बिघडली आहे. आणि त्यावर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, मंत्रीमंडळाच्या बैठकीत, ओबीसी नेते तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, यांनी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना बोगस कुणबी जात प्रमाणपत्रे वितरित होणार नाहीत याची सरकारने खात्री केली पाहीजे. अशी मागणी केली. तसेच मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात मागिल दरवाजाने आरक्षण देण्याच्या प्रयत्न केला तर विरोध केला जाईल. त्यानंतर शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी भुजबळांनी अशा प्रकारचा गैरसमज पसरवायचा प्रयत्न करू नये अशी माध्यमांशी बोलताना समज दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच राज्यात आणि महायुतीमध्ये तणाव वाढेल अशी वक्तव्य करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
आज माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “या मुद्द्यावर मंत्रिमंडळात गँगवार सुरू आहे. ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरू आहे... मला तर वाटतंय की, कॅबिनेट बैठकीत एक-दोन मंत्री मार खातील. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या अंगावर धावून जाण्यापर्यंतची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण राजकिय वातावरण बिघडले आहे. यावर मुख्यमंत्र्यांचे कोणतेच नियंत्रण नाही. शंभूराज देसाई असोत की छगन भुजबळ अशी परिस्थिती राज्यात कधीच उद्भवली नाही." असे टिका संजय राऊत यांनी केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे यांनी नऊ दिवसांचे उपोषण केल्यावर सरकारने तात्काळ हालचाल करून मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीची पुर्तता करण्यासाठी 24 डिसेंबरची अंतिम मुदत मागितली आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होऊन त्यामध्ये मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद झाल्याचे समोर आले आहे.