महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वाघनखांवरून संजय मंडलिकांचा आदित्य ठाकरेंना टोला ; म्हणाले, स्वत:ची नखे वाघनखे...

05:25 PM Sep 30, 2023 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

Sanjay Mandlik News : नवरात्र उत्सवामध्ये भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून पालकमंत्री दिपक केसरकर आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शेतकरी सहकारी संघाची भवानी मंडप येथील इमारत अचानक ताब्यात घेतली. यावरून संघाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. इमारतीचा वाद सर्वोच्च न्यायालयात असतानाही कुलुप तोडून ताबा घेणाऱ्या जिल्हाधिकारी रेखावार यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी संघाने केलीय. यावर आता खासदार संजय मंडलिक यांनीही नाराजी व्यक्त करत सरकारने सहकार चळवळीचा अपमान केल्याची टिका केलीय. आज ते कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी वाघनखांवरून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

Advertisement

यावेळी बोलताना मंडलिक म्हणाले की,  यासंदर्भातील चर्चा लोकप्रतिनिंधींशी संघाच्या प्रशासकांनी करणे गरजेचे होतं. मात्र अचानक जागा ताब्यात घेणं हे चुकीचं आहे. शासनाला आवश्यकता असेल तर संबंधित घटकांशी चर्चा करावी. नेमकी कोणती आपत्ती आली याचे मार्गदर्शन करावे. जागा काढून घेणे म्हणजे शेतकरी संघाचा नाही तर सहकार चळवळीचा अपमान आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याशी आम्ही चर्चा करू असेही मंडलिक यांनी स्पष्ट केले.

Advertisement

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे 16 नोव्हेंबरला भारतात आणली जाणार आहेत. मात्र यावर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. ही वाघनखे ओरीजनल आहेत का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.ठाकरेंच्या या वक्तव्यावर खासदार मंडलिकांनी मिश्किली शब्दात टोला लगावला.

यासंदर्भात बोलताना मंडलिक म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची स्मृती चिन्ह भारतात आल्यावर निश्चितच शिवप्रेमींना आनंद होणार आहे.मात्र वाघनखांवर संशय व्यक्त करणाऱ्या आदित्य ठाकरेंना स्वत:ची नखे वाघनखे वाटत असतील असा टोला खासदार संजय मंडलिक यांनी लगावला. यावेळी मंडलिकांसह कार्यकर्त्यांमध्ये हश्शा पिकला.

 

Advertisement
Tags :
#Aaditya Thackeray#kolhapur#kolhapurnews#sanjaymadlik
Next Article