सानिया वत्स विजेती
06:34 AM Dec 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ मुंबई
Advertisement
रविवारी येथे झालेल्या 11 व्या सुनील वर्मा स्मृती स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या पाचव्या मानांकित सानिया वत्सने महिला विभागातील विजेतेपद मिळविताना चौथ्या मानांकित निरुपमा दुबेचा पराभव केला.
महिलांच्या विभागातील अंतिम सामन्यात पाचव्या मानांकित सानिया वत्सने दुबेचा 11-6, 11-9, 11-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. दिल्लीच्या सानिया वत्सचे पीएसए स्क्वॅश टूरवरील हे स्पर्धेतील पहिले विजेतेपद आहे. तसेच या स्पर्धेत फ्रान्सच्या द्वितीय मानांकित मॅसिओ लेव्हिने इजिप्तच्या स्क्वॅशपटूचा पराभव करत पुरुषांच्या विभागातील विजेतेपद पटकाविले.
Advertisement
Advertisement