महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोकमान्य मॅरेथॉनचे प्रमुख आकर्षण सानिया मिर्झा

06:08 AM Dec 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने एनजीओ लोककल्प फौंडेशनच्या समर्थनार्थ 12 जानेवारीला ‘लोकमान्य मॅरेथॉन 2025’ चे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेची भारतीय टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा प्रमुख आकर्षण ठरणार असून तिचे बेळगावमध्ये प्रथमच आगमन होत आहे.

Advertisement

लोकमान्य आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धेवेळी प्रमुख अतिथी म्हणून भारताचे नाव टेनिस जगतात उज्ज्वल करणारी टेनिससम्राज्ञी सानिया मिर्झा प्रथमच बेळगावात येत असून ही या स्पर्धेसाठी खास उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. सानिया मिर्झाने भारतीय टेनिस क्षेत्रात जागतिक स्तरावर यशस्वी होऊन ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू आहेत. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत महेश भूपतीसोबत पहिला ग्रँडस्लॅम जिंकत त्यांनी इतिहास रचला. 2015 मध्ये विंम्बल्डनमध्ये महिला दुहेरी गटात ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावून आणखी एक इतिहास रचला. 2005 मध्ये ओमान टेनिस असोसिएशनतर्फे नवोदित खेळाडू म्हणून गौरविण्यात आल्या होत्या. त्याशिवाय दुहेरी गटामध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचलेल्या खेळाडूंपैकी एक आहेत. 91 आठवडे त्या या स्थानावर राहण्याचा विक्रमही केला आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 43 वुमन्स असोसिएशनचे दुहेरी विजेतेपद पटकाविले तर चार वेळा ऑलिंपियन राहिल्या आहेत. 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये मिश्र दुहेरीत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला होता. त्यांनी लियांडर पेससोबत मिश्र दुहेरीत कांस्यपदक तर 2003 मध्ये विम्बल्डनमध्ये दुहेरीत आलिसा क्लेइबानोव्हा यांच्या साथिने जेतेपद पटकावले होते. त्या एकेरीत टॉप 30 मध्ये स्थान मिळविणाऱ्या एकमेव भारतीय आहेत. मार्टिना हिंगीससोबतच्या दुहेरी गटातील भागिदारीने 3 ग्रँडस्लॅम व 2 डब्ल्यूटीए फायनल्स जिंकत आपले नाव जागतिक पटावर कोरले. अशा या महान खेळाडूची 12 जानेवारी रोजी बेळगाव येथे होणाऱ्या लोकमान्य मॅरेथॉन स्पर्धेत उपस्थिती असणार आहे.

6 लाखाहून अधिक बक्षिसाच्या या मॅरेथॉन स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील धावपटू त्याचप्रमाणे आंतरराज्य धावपटूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही केवळ स्पर्धा नसून फिटनेस, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांचा एक अनोखा संगम आहे. या मॅरेथॉनचा मुख्य उद्देश फिटनेसला प्रोत्साहन देणे आणि अधिक लोकांमध्ये उत्तम आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करणे आहे. या मॅरेथॉनमधून मिळणारे उत्पन्न लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने दत्तक घेतलेल्या ग्रामीण भागातील वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्यात येईल. यामध्ये शालेय साहित्य, स्वेटर, शाळांना मदत व शैक्षणिक सुविधा पुरविणे यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. त्यामुळे या मॅरेथॉनच्या माध्यमातून आयोजकांनी शैक्षणिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्याचे तसेच वंचित समाजातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी योगदान देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या स्पर्धेत दै. तरुण भारत यांचे मीडिया पार्टनर म्हणून सहकार्य लाभले आहे.

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने कणकुंबी व चोर्ला जंगलातील दुर्गम भागातील 32 खेडी दत्तक घेतली आहेत. नियमितपणे शाळांना हिरव्या व काळ्या फळ्याचे वितरण, शैक्षणिक साहित्य व स्वेटर यासारखी आवश्यक शैक्षणिक साधने पुरविण्यात येतात. या शिवाय आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून ग्रामस्थांच्या मूलभूत गरजा पूर्ण करून त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी कटिबद्ध आहेत.

ही मॅरेथॉन वंचित समाजातील विद्यार्थी कल्याणासाठी पाठिंबा देण्याच्या उदात्त उद्देशाने आयोजित करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा, बागलकोट, जमखंडी, मुधोळ, विजापूर, हुबळी-धारवाड, गोवा, सावंतवाडी, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी आणि उर्वरित महाराष्ट्रातील विविध वयोगटातील 5000 हून अधिक स्पर्धक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

नोंदणी शुल्क

3 कि.मी.साठी 300 रुपये, 5 कि.मी. 700 रुपये, 10 कि.मी. 800 रुपये नोंदणी शुल्क आहे.

10 कि.मी. धावणे गट

1) 30 वर्षे वयोगटासाठी (पुरुष आणि महिला) प्रथम क्रमांक 25 हजार, द्वितीय (पुरुष आणि महिला) 15 हजार, तृतिय (पुरुष आणि महिला) क्रमांकासाठी 10 हजार रुपये बक्षीस आहे.

2) 30 ते 45 वर्षे वयोगटासाठी (पुरुष आणि महिला) प्रथम क्रमांक 25 हजार, द्वितीय (पुरुष आणि महिला) 15 हजार, तृतिय (पुरुष आणि महिला) क्रमांकासाठी 10 हजार रुपये बक्षीस आहे.

3) 45 ते 55 वर्षे वयोगटासाठी (पुरुष आणि महिला) प्रथम क्रमांक 20 हजार, द्वितीय (पुरुष आणि महिला) 15 हजार, तृतिय (पुरुष आणि महिला) क्रमांकासाठी 10 हजार रुपये बक्षीस आहे.

4) 55 वर्षांवरील वयोगटासाठी (पुरुष आणि महिला) प्रथम क्रमांक 25 हजार, द्वितीय (पुरुष आणि महिला) 15 हजार, तृतिय (पुरुष आणि महिला) क्रमांकासाठी 10 हजार रुपये बक्षीस आहे.

5 कि. मी. धावणे गट

1) 17 वर्षांखालील वयोगटासाठी (पुरुष आणि महिला) प्रथम क्रमांक 15 हजार, द्वितीय (पुरुष आणि महिला) 10 हजार, तृतिय (पुरुष आणि महिला) क्रमांकासाठी 7 हजार रुपये बक्षीस आहे. 2) 17 वर्षांवरील वयोगटासाठी (पुरुष आणि महिला) प्रथम क्रमांक 15 हजार, द्वितीय (पुरुष आणि महिला) 10 हजार, तृतिय (पुरुष आणि महिला) क्रमांकासाठी 7 हजार रुपये बक्षीस आहे.

3 कि.मी. धावणे गट

1) 14 वर्षांखालील वयोगटासाठी (मुले आणि मुली) प्रथम क्रमांक 10 हजार, द्वितीय (मुले आणि मुली ) 7 हजार, तृतिय (मुले आणि मुली) क्रमांकासाठी 5 हजार रुपये बक्षीस आहे.

2) खुला वयोगटासाठी (पुरुष आणि महिला) प्रथम क्रमांक 10 हजार, द्वितीय (पुरुष आणि महिला) 7 हजार, तृतिय (पुरुष आणि महिला) क्रमांकासाठी 5 हजार रुपये बक्षीस आहे.

या मॅरेथॉनसाठी देशभरातील कोणतेही स्पर्धक 10 कि. मी., 5 कि. मी. आणि 3 कि. मी. धावणेमध्ये सहभाग घेऊ शकतात. यासाठीची नोंदणी 31 डिसेंबर 2024 पर्यंत करता येणार आहे. सहभागी स्पर्धकांना पदके, प्रमाणपत्र, टी-शर्ट, किट बॅग व स्पर्धेनंतर नाश्ता देण्यात येईल, असे आयोजकांनी कळविले आहे. स्पर्धेच्या मार्गावर पाणी आणि लोकमान्य रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात येणार आहे.

https://www.runindia.in/events/lokmanaya-marathon-run-for-education-2025

या संकेतस्थळाला भेट देऊन स्पर्धकांनी नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी नजीकच्या लोकमान्य सोसायटीच्या शाखेतून नोंदणी प्रवेशिका भराव्या. अधिक माहितीसाठी 7795972635, टोल फ्री क्रमांक 1800 2124050 यावर संपर्क करावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article