For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : सांगलीत 'ओपन बार' आता पोलिसांच्या टार्गेटवर!

12:57 PM Nov 16, 2025 IST | NEETA POTDAR
sangli news   सांगलीत  ओपन बार  आता पोलिसांच्या टार्गेटवर
Advertisement

                  विश्रामबाग पोलिसांची रात्रीची छापेमारी

Advertisement

सांगली : सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर विश्रामबाग पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने काल छामेपारी केली. १६ मद्यपींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून त्यात हॉटेल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. ही मोहीम पुढील टप्प्यात आणखी व्यापक प्रमाणावर केली जाणार असल्याचे विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सांगितले.

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी आता ठोस अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी, मैदानांवर मद्यप्रशान करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्यांवरही कारवाईचे आदेश दिले आहे. त्यानुसार काल रात्री विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पथकाने राज्य उत्पादन शुल्कच्या मदतीने कारवाईचा धडाका लावला. सोळा जणांवर कारवाई करण्यात आली.

Advertisement

त्यात सुनील देसाई (आरग), दिनेश निकम (सलगरे), क्रांतीकुमार तांबे (मिरज), शुभम वगरे (सांगली), अनिकेत जाधव (मुंबई), राहुल निकम (सांगली), प्रदीप कदम (पुणे), स्वप्नील व्यास (इस्लामपूर), पवन आरबूणे (विश्रामबाग), सौरभगवळी, अनिल भट्टी, परेश भट्टी, हर्षद भट्टी, राकेश ऐनापुरे (सर्व सांगली), रेहान महावत (इचलकरंजी) आणि हॉटेल व्यवस्थापक साजीब बिसवास (इनामधामणी) यांचा समावेश आहेत. ही कारवाई आणखी व्यापक होणार आहे. संशयितांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उत्पादन शुल्कचे निरीक्षक दीपक सुपे तपास करत आहेत.

उपनिरीक्षक सतेज कार्वेकर, अजय लोंढे, लक्ष्मण पवार, अंमलदार अमर मोहिते, संदीप साळुंखे, नंदकुमार मदने, शुभांगी मुळीक, विष्णू गावडे, जावेद अत्तार, प्रशांत माळी, सुनील शिंदे, सचिन गोदे, भगवान शिंदे, सुहैल कार्तीयानी, स्वप्नील आटपाडकर, विनायक खांडेकर, शाहीन शेख, कविता सुपने, स्वप्नील कांबळे यांनी कारवाई केली.

Advertisement
Tags :

.