सांगलीची स्मृती होणार इंदूरची सून!
स्मृतीचा प्रियकर आणि गायक पलाश मुच्छलने दिली माहिती
वृत्तसंस्था/ इंदूर
नॅशनल क्रश, लाखो दिलोंकी धडकन... अशा उपाधी मिळालेली टीम इंडियाची दिग्गज फलंदाज स्मृती मानधनाचे लग्न ठरल्याचे समोर आले आहे. स्मृती मानधना ही आता इंदूरची सून बनणार आहे. स्मृतीचा प्रियकर आणि गायक, संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलने याबाबतची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
स्मृतीचा प्रियकर आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलने इंदूरमध्ये भारत-इंग्लंड महिला विश्वचषक सामन्यापूर्वी हा खुलासा केला. स्मृती आणि पलाश गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनीही सोशल मीडियावरील पोस्टमधून रिलेशनशिपमध्ये असल्याचे अनेकदा दाखवून दिले आहे. पण आजपर्यंत कधीच त्यांच्या लग्नाची चर्चा झाली नव्हती, पण आता पलाशच्या वक्तव्याने हे दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे. याबाबत बोलताना पलाश म्हणाला, स्मृती लवकरच इंदूरची सून होणार आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे. तुम्हाला ही बातमी हेडलाईनसाठी पुरेशी आहे’. 30 वर्षीय पलाश मुच्छल हा इंदूरचा रहिवासी असून तो बॉलिवूडमधील गायक, चित्रपट निर्मातादेखील आहे.