Sangli Politics : पालकमंत्र्यांच्या दौऱ्याकडे सांगलीकरांचे लक्ष
सांगलीत गाडगीळ–खाडे यांची मतभिन्नता
सांगली : आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदन आणि आमदार सुरेश खाडे यांनी त्यांची री ओढल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यादृष्टीने शुक्रवारी पालकमंत्री जिल्हा दौऱ्यावर येत असून ते या नेत्यांशी काय चर्चा करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या २२ माजी नगरसेवकांना महापालिका निवडणुकीत पुन्हा तिकीट देण्याच्या वक्तव्यावरून आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी प्रश्रचिन्ह उभे केले आहे. जयश्रीताई पाटील यांच्यासोबत केवळ सहा माजी नगरसेवकांनी प्रवेश केला असताना २२ लोक कुठून आले? या काळात आपण भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची साथ देणार आहोत आणि त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे पत्रक त्यांनी प्रसिद्ध केले होते.
याच पार्श्वभूमीवर गुरुवारी माजी पालकमंत्री आणि आमदार सुरेश खाडे यांनीही मिरजेत भूमिका मांडली. पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देताना प्राधान्य दिले जाईल. दादा वेगवेगळ्या ठिकाणी न काय बोलले यापेक्षा उमेदबारी ही योग्य मुद्यांवर ठरवली जाईल बाहेरून आलेल्यांना आणि पक्षात आधी असलेल्यांना देखील योग्य न्याय मिळेल अशी भूमिका घेतली आहे.
दादांच्या वक्तव्यानंतर या दोन आमदारांनी व्यक्त केलेल्या मतांबद्दल पक्षात वेगवेगळी मते आहेत. नव्याने प्रवेश केलेल्या काही नेत्यांनी असे वक्तव्य होऊ शकते कारण प्रत्येकाला आपापले कार्यकर्ते सांभाळायचे आहेत. ज्याला त्याला त्याच्या निवडून येण्याच्या क्षमतेवर विश्वास असतो. पण, अंतिम निर्णय योग्य तोच होईल असा आशावाद व्यक्त केला आहे. काही नेत्यांनी याबद्दल बोलणे टाळले असून योग्य वेळी योग्य ठिकाणी त्याबद्दल चर्चा होईल अशी भूमिका घेतली आहे.