Sangli : माऊथ ऑर्गन, सेक्सोफोन, गिटारच्या सुरात सांगलीकर न्हाले...
सांगलीत माऊथ ऑर्गन, सॅक्सोफोन, गिटारचा अविस्मरणीय संगम
सांगली : येथील भावे नाट्य मंदिरात रविवारी दुपारी माऊथ ऑर्गन, सॅक्सोफोन आणि गिटार या वाद्यांच्या मोहक सुरावटींनी सांगलीकर रसिकांना अक्षरशः भारावून टाकले. हिंदी चित्रपटातील विविध गीतांची ही अविस्मरणीय सुरेल मैफिल दुपारी ४ ते ७ दरम्यान रंगली.
या कार्यक्रमात डॉ. भरत शहा आणि सुभाश नानीवडेकर यांनी माऊथ ऑर्गनवर है अपना दिल तो आबारा, मेरे सपनों की रानी, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, रूपेरी बाळूत प्रीतीच्या बनात ये ना, यांसारखी लोकप्रिय गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली.
सॅक्सोफोन आणि गिटारवर अतुल शहा व दीपक शहा यांनी ये कहाँ आ गये हम, कह दूँ तुम्हें या चुप रहूँ, दीवाना हुआ बादल, रिमझिम गिरे सावन या भावगीतांची सुंदर सादरीकरणे केली. बाद्य आणि गायन यांचा संगम साधत मैफिलीला सुरेल उंची मिळाली.
या संगीत सोहळ्याला सांगलीकरांनीमोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाका-रांना भरभरून दाद दिली. सभागृहात बाताबरण आनंदी आणि रसिकतेने ओथंबले होते.
कार्यक्रमाचे आयोजन त्वचारोग तज्ज्ञ डॉ. भरत शहा, स्वरधारेचे अतुल शहा, तसेच 'फिर से गीत', 'केडब्ल्युसी गीत संगीत आनंद यात्रा' या संस्थांचे विष्णू शिंदे, शिरीष जोशी, रमेश शहा आणि दिलीप शहा यांनी संयुक्तरीत्या केले होते. कार्यक्रमाचे निवेदन साक्षी घोरपडे यांनी मनमोहक शैलीत केले.