जि.प.चा 50 कोटी 29 लाखांचा अर्थसंकल्प; शासनाकडे 52 कोटी थकल्याने बजेट कोलमडले, विकास कामांना कात्री
सांगली प्रतिनिधी
सांगली जिल्हा परिषदेचा 2023-24 चा 136 कोटी 81 हजार 623 रूपयांचा अंतीम सुधारीत व 2024- 25 चा 50 कोटी 29 लाख 27 हजार 886 रूपयांचा मूळ, 37 हजार 717 ऊपयांचा शिलकी अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना सादर करण्यात आला.
जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्पा मुख्यकार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सादर केला. यामध्ये मागील वर्षीपेक्षा या चालू वर्षीचा मुळ अर्थसंकल्प 66.14 कोटींचा होता. यात चालू वर्षी सुमारे 16 कोटींच्या तुरतुदी कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विकास कामांना कात्री लावण्यात आली आहे. शासनाकडे जिल्हा परीषदेचे विविध करापोटी 51 कोटी 71 लाख रूपये थकीत आहेत. ही रक्कम मिळाल्यानंतर प्रथम सुधारित अर्थसंकल्पात विकास कामांच्या तरतूदी वाढवण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या मुळ अर्थसंकल्पात दोन कोटी दोन लाख 55 हजार यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष मानधन प्रवास भता आणि अनुषांगिक खर्चाचा समावेश आहे. नव्याने इ गव्हर्नन्स हे लेखाशीर्ष निर्माण केले असून प्रशासनाची गतिमानता वाढवण्यासाठी काही प्रकल्प सामान्य प्रशासन विभागामार्फत हाती घेतले जाणार आहेत. ग्रामपंचायत विभागासाठी चार कोटी 25 लाखाची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्क हिस्सा ही प्रमुख बाब असून त्या अंतर्गत 2 कोटी 50 लाखाची तरतूद आहे. यशवंत वसंत घरकुल योजना 25 टक्के सुमारे एक कोटींचा निधी आपती, पुर राखीव ठेवण्यात आला आहे.
शिक्षण विभागासाठी एक कोटी 56 लाख 79 हजाराची तरतूद करण्यात आलेली आहे. यात ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेचा विकास कार्यक्रमांतर्गत जीवन कौशल्याचा विकास आणि तत्सम शैक्षा†णक कार्यक्रमासाठी 15 लाख, हापनेस प्रोग्राम साठी पाच लाखांची तरतूद आहे. बांधकाम विभागासाठी चार कोटी 88 लाख ची तरतूद करण्यात आलेली आहे. लहान पाटबंधारे विभागासाठी 26 लाखांची तरतूद केली आहे. आरोग्य विभाग अंतर्गत 2 कोटी 41 लाख 15 हजाराची तरतूद केली आहे. यामध्ये आरोग्य शिबिरे, श्वान व सर्पदंश लस खरेदी आदि तरतुदी आहेत.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग विभागासाठी 81 लाख 21 हजाराची तरतूद केली आहे. कृषी विभागासाठी एकूण एक कोटी 25 लाख 26 हजाराची तरतूद केली असून नव्याने दोन योजना प्रस्तावित केलेल्या आहेत. यामध्ये जिह्यातील शेतक्रयांना पीव्हीसी पाईप पुरवठा करणे व स्लरी या†नट पुरवठा करणे या दोन नव्याने योजना घेण्यात आलेली आहेत. यासाठी 30 लाखाची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच चाफ कटरची मागणी लक्षात घेता 55 लाखांची तरतूद केलेली आहे. पशुसंवर्धन ा†वभागासाठी एकूण 63 लाख 50 हजार ची तरतूद करण्यात आलेली आहे.
समाज कल्याण ा†वभागासाठी एक कोटी 73 लाख 18 हजाराची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये मुलींना सायकल साठी अर्थसहाय्य देण्याची नवीन योजना समा†वष्ट करण्यात आली असून यासाठी 7 लाख 79 हजार ऊपयांची तरतूद आहे. मा†हला व बालकल्याण या ा†वभागासाठी 36 लक्ष 65 हजारांची तरतूद केली आहे. ा†नवृत्तीवेतन व संकीर्ण मध्ये 7 कोटी 13 लाख 24 हजारांची तरतूद करण्यात आली आहे.