Sangli Crisis News: सांगलीचा गावभाग आणि हरिपूर रोडवर पाण्याचा ठणठणाट
ठिकठिकाणी अशी खुदाई करूनही पाणी गळती सापडत नाही
सांगली: शहरातील कृष्णा नदीच्या अगदी काठावर असणा-या गावभागासह हरिपूर रोड येथे गेल्या काही दिवसापासून पाण्याचा ठणठणाट सुरु आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दुरुस्तीसाठी अनेक वेळा खुदाई करूनही त्यांना या भागातील गळती सापडत नसल्याने पाणीपुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. याकडे गावभाग प्रभाग क्रमांक १४ मधील माजी नगरसेवकांचे दुर्लक्ष झाले आहे. पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत येथील नागरिकांतून तीव्र नाराजी व संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गावभागातील पाणी समस्या दूर करण्यासाठी टी बदलण्यात आला. पण त्यामुळे रविवारी डवळे तालीम
सांगली ठिकठिकाणी अशी खुदाई करूनही पाणी गळती सापडत नाही, परिसर संग्राम चौक या मागात अजिबात पाणी आते नाही. आठवडा झाला तरी समस्या चुटेना. दोन गल्लीत किमान सहा-सात ठिकाणी नवीन केलेल्या रस्त्यांची खुदाई करून हि पाणीपुरवठा विभागातीत लोकांना नेमके कारण सापडेना.
हरिपूर रोडवरही पाणीटंचाईची समस्या आहे. हरिपूर रोडला पुलाचे काम चालू आहे. तिथे पाण्याची पाईप लिकेज झाली आहे ती दुरुस्त झाली कि पाणीपुरवठा सुरळीत होईल असे सांगण्यात येते. प्रत्यक्षात मात्र दुरुस्तीच्या नावाखाली केवळ खुदाई सुरू आहे. कृष्णामाई रोडला सहा महिने झाले पाण्याची समस्या आहे. वारंवार सांगूनही त्याकडे माजी नगरसेवक व प्रशासनाचे लक्ष नाही.