For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मतदानासाठी यंत्रणा सज्ज; 18 लाखांवर मतदार : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

01:03 PM May 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
मतदानासाठी यंत्रणा सज्ज  18 लाखांवर मतदार   जिल्हाधिकारी डॉ  राजा दयानिधी
Dr Raja Dayanidhi
Advertisement

10 हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती : 2988 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई : तगडा पोलीस बंदोबस्त

सांगली प्रतिनिधी

सांगली लोकसभा मतदार संघासाठी मंगळवार दि. 7 मे रोजी मतदान होत आहे. यासाठी प्रशासकिय यंत्रणा सज्ज आहे. सुमारे 1830 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडेल. यासाठी 10 हजार 772 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. याशिवाय गंभीर गुन्हे असलेल्या 2988 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी भयमुक्तपणे मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पत्रकार बैठकित बोलताना केले.

Advertisement

डॉ. राजा दयानिधी म्हणाले, सांगली लोकसभा मतदार संघामध्ये सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. 18 लाख 68 हजार 174 इतकी मतदार संख्या आहे. यामध्ये 9 लाख 53 हजार पुऊष मतदार, स्त्री मतदारांची संख्या 9 लाखा 15 हजार तर इतर मतदारांची संख्या 124 इतकी आहे. जिल्हाभरात 1830 मतदार केंद्रे आहेत. जवळपास 10 हजार 772 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनसह कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी रवाना होतील. यासाठी 350 एसटी बसेस व 144 इतर वाहनांची सोय करण्यात आली आहे.

मतदारांना ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सोबत ठेवावे लागणार आहे. याशिवाय आधारकार्ड, मनरेगा कार्ड, बँक, टपाल खात्याचे पासबुक, वाहनचालक परवाना, पासपोर्ट यासह अन्य 12 ओळखपत्रेही चालतील. प्रत्येक मतदान केंद्रावर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. आचारसंहितेच्या उल्लंघन प्रकरणी सांगली व जत येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हृयात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

Advertisement

सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. अवैध दाऊ, पैसे वाहतूक होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेत आवश्यकता त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. काही ठिकाणी उन्हापासून बचाव करण्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. प्राथमिक उपचार पेटीसोबत वैद्यकिय कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग, गरोदर माता, जेष्ठ नागरिक यांच्यासाठी थेट मतदानाची सोय करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी निपक्ष व निर्भय वातावरणामध्ये मतदान करावे असे आवाहन डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे उपस्थित होते.

2988 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे म्हणाले, नागरिकांना निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 2988 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय गंभीर गुन्हे असलेल्या 32 व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. 2274 परवानाधरक शस्त्रे आहेत. ते जमा करण्याचे काम सुऊ आहे. स्थानिक पोलिसांबरोबरच अन्य जिह्यातूनही पोलिस बळ मागविण्यात आले आहे. राखीव पोलिस दल, राज्य राखीव पोलिस दलासह क्युआरटी टीमही तैनात करण्यात आल्या आहेत.

सांगली लोकसभा             मतदार संख्या
पुऊष मतदार                   953024
स्त्री मतदार                      915026
इतर मतदार                           124
एकूण मतदार                 1868174

Advertisement
Tags :

.