For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भरधाव दुधाच्या टँकरने तिघांना उडविले; १ ठार २ जखमी

01:29 PM Jun 19, 2024 IST | Abhijeet Khandekar
भरधाव दुधाच्या टँकरने तिघांना उडविले  १ ठार २ जखमी
Sangli
Advertisement

विजापूर गुहागर मार्गवरील धावडवाडी येथील घटना

जत प्रतिनिधी

जत तालुक्यातून गेलेल्या विजापूर- गुहागर राष्ट्रीय मार्गावरील धावडवाडी येथील बसस्थानक येथे रस्त्याच्या कडेला उभारलेल्या एकास रिकाम्या दुधाच्या टँकरने उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच पुढे मोटरसायकलवरून जाणाऱ्या अन्य दोघांनाही या टँकरने धडक दिली. यात मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता घडली. अपघातात अहमद अली बाबासो शेख (वय 56, रा. धावडवाडी, सध्या रा. मुंबई) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते मुंबई येथे बेस्ट बसमध्ये नोकरीस होते. बकरी ईद सणामुळे ते गावी आले होते. सण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्यांचा या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला.

Advertisement

अधिक माहिती अशी, अहमदअली हे सकाळी दहाच्या सुमारास धावडवाडी येथे लागून असलेल्या बस स्टॉपशेजारी उभे होते. नागजकडून येणाऱ्या भरधाव दुधाच्या टँकरने त्यांना उडविले. त्याच बरोबर पुढे असणाऱ्या दोन मोटरसायकलस्वारांनाही जोराची धडक दिली. मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले. दुचाकीवरील जखमी झालेल्यांमध्ये दुर्योधन तानाजी कोळेकर (वय 21), किरण मनोहर सूर्यवंशी (वय 22) दोघे रा. धावडवाडी, ता. जत अशी नावे आहेत.

दरम्यान हा अपघात झाल्यानंतर टँकर चालक न थांबता तसाच पुढे सुसाट निघून गेल्याने, गावातील लोकांनी टँकरचा पाठलाग करत जत तालुक्यातील वायफळ येथे पकडून जत पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी टँकरचालक बबन गजाराम गायकवाड (वय 41, रा. वाणीचिंचाळे ता. सांगोला) यास जत पोलिसांनी अटक केली. तर मयत अहमदअली यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.