महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

Sangli Crime : मुलीच्या अपहरणातील आरोपीचा धारदार शस्त्राने भोसकून युवकाचा खून; सांगली शहर हादरले

10:45 AM Apr 11, 2024 IST | Abhijeet Khandekar
Sangli Murder
Advertisement

सांगली प्रतिनिधी

येथील गणपती मंदिराच्या दारात भाविकांच्या गर्दीमध्ये खुनीहला व अपहरणाच्या गुह्यातील संशयित राहुल संजय साळुंखे (रा. 19, रा. जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट, सांगली) याचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. तर त्याचा साथीदार तेजस प्रकाश करांडे (वय 21, रा. जामवाडी) हा जखमी झाला. रात्री सव्वा आठच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यामुळे भाविकांची पळापळ झाली.

Advertisement

पोलिसांनी नोंदलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मृत राहुल साळुंखे हा जामवाडीमध्ये राहतो. जुना बुधगाव रस्ता आणि जामवाडीतील मित्रांचा त्याचा ग्रुप आहे. जानेवारी महिन्यात दि. 18 रोजी कोयत्याचा धाक दाखवून सांगली कोल्हापूर रस्त्यावर राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे भर दुपारी अपहरण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. यावेळी मुलीच्या आईवर कोयत्याने वार कऊन जीवे मारण्याचा प्रयत्न हलेखोरांनी केला होता. सांगली शहर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मुलीची सुटका केली होती.

Advertisement

याप्रकरणी समर्थ भारत पवार (वय 22, रा. जुना बुधगाव रस्ता, राजीव गांधीनगर, सांगली), राहुल संजय साळुंखे (रा. 19, रा. जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट, सांगली), आदित्य गणेश पवार (वय 20, रा. पंत मंदिर नजीक, जामवाडी, सांगली), शुभम नामदेव पवार (वय 22 रा. श्रीनिवास अपार्टमेंट, गावभाग, सांगली) या टोळीला अटक केली होती.

खुनी हला, अपहरणाच्या गुह्यात अटक झालेला राहुल साळुंखे काही दिवसापूर्वी जामिनावर बाहेर आला होता. सांगलीतील गणपती मंदिर परिसरात त्याचा अड्डा असायचा. बुधवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास तो दुचाकीवरून गणपती मंदिरासमोर आला. दुचाकी लावल्यानंतर त्याला हलेखोरांनी घेरले. धारदार शस्त्राने त्याला भोसकल्यानंतर तो खाली पडला. त्याचा मित्र तेजस कारंडे याच्या डोक्यावर हला केला. मंदिरासमोर भाविकांची गर्दी होती. स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त सर्वत्र गर्दी होती. त्याच गर्दीत हा हला झाला. गर्दीतच हलेखोर पसार झाले.

Advertisement
Tags :
kills youthsanglisharp weaponTarun Bahrat News
Next Article