सांगलीसह जिल्ह्याला वळवाने झोडपले ! वादळी वाऱ्याने झाडे पडली : शहर परिसरात पाण्याची तळी
वीजपुरवठा खंडित : उष्म्याने वैतागलेल्या जिल्हावासियांना शिडकाव्याने दिलासा
सांगली प्रतिनिधी
गेल्या काही दिवसापासून प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना वळवाच्या तडाख्याने दिलासा मिळाला. बुधवारी सायंकाळी सांगली मिरजेसह जिल्हयात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वाऱ्यामुळे सांगलीसह परिसतील अनेक गावामध्ये झाडे पडली. यामुळे सुमारे दहा तासापेक्षा जास्त काळ वीजपुरवठा खंडित झाला. तर झाडे पडल्याने अनेक ठिकाणचे मार्गही बंद झाले. जिल्हयात काही ठिकाणी गाराही पडल्या. तर उष्म्यामुळे वैतागलेल्या जिल्हावासियांना वळवाच्या शिडकाव्याने काहीसा दिलासा मिळाला. सांगलीच्या स्टेशन चौकातील प्रचारसभेसाठी उभारण्यात आलेला महायुतीचा मंडपही जोरदार वाऱ्याने कोसळला.
यंदाच्या उन्हाळयात वादळी तसेच अवकाळी पाऊस झालाच नाही. पूर्ण मार्च महिना उन्हाळी पावसाविना गेला. तर एप्रिलचे तीन आठवडे संपल्यानंतर बुधवारी सायंकाळी ढगांच्या गडगडासह वादळी पावसाने हजेरी लावली. सांगली आणि मिरज शहरासह जिल्हयातील अनेक ठिकाणी वळवाच्या पावसाने झोडपून काढले. मिरज पुर्व भागातील मालगाव, खंडेराजुरी, बेळंकी, सलगरे, एरंडोली, टाकळी, गुंडेवाडी येथे विजांच्या कडकडासह व जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. येथे काही ठिकाणी गारा पडल्या. प्रचंड उकाडयाने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला.
द्राक्ष शेती, छाटणी व शेतीसाठी हा पाऊस उपयोगी असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. म्हैसाळ, विजयनगर, नरवाड, वड्डी, ढवळी, तसेच कागवाड परिसरात दुपारी चार ते पाच दरम्यान वादळी वारा व मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. आरग येथे पवार वस्तीवर झाडे पडल्याने येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता.
खानापूर घाटमाथ्यावरही वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. येथेही काही ठिकाणी गारा पडल्या. तासगाव तालुक्यातील ढवळी, पाडळी, मणेराजुरी, सावर्डे ,कुमठे फाटा येथेही गारांचा पाऊस झाला. तर मिरज पश्चिम भागातील गावासह सांगली परिसरातील माधवनगर, बुधगाव आदी ठिकाणी चांगला