For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News: आमदार गोपीचंद पडळकरांच्या निषेधार्थ पेठ-सांगली रस्ता रोखला

03:17 PM Sep 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
sangli news  आमदार गोपीचंद पडळकरांच्या निषेधार्थ पेठ सांगली रस्ता रोखला
Advertisement

राजीनामा न घेतल्यास होणाऱ्या परिणामास राज्य सरकार जबाबदार असेल

Advertisement

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने आ. गोपीचंद पडळकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ सांगली-पेठ रस्ता रोखण्यात आला. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी आ. गोपीचंद पडळकर यांचा राजीनामा घ्यावा. राजीनामा न घेतल्यास होणाऱ्या परिणामास राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला.

यावेळी पोलीसांनी पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेवून सोडून दिले. याप्रसंगी वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, जिल्हा अध्यक्ष सुस्मिता जाधव, महिला अध्यक्षा सुनिता देशमाने, शहराध्यक्ष शहाजी पाटील, बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिकराव पाटील, बाजार समितीचे अध्यक्ष अशोक पाटील, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, खंडेराव जाधव, अरुण कांबळे, आनंदराव पाटील, युवक अध्यक्ष संग्राम जाधव, पुष्पलता खरात यांच्यासह विविध संस्थाचे संचालक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

अध्यक्ष विजयराव पाटील म्हणाले, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे. मुख्यमंत्री यांनी आपल्या आमदारांचा राजीनामा घ्यावा. महाराष्ट्रात अशा वाचाळवीर आमदारांमुळे सुसंस्कृत महाराष्ट्राला गालबोट लावण्याचे काम केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने महाराष्ट्रात सर्वत्र आंदोलन होत आहे. या आंदोलनास वेगळे वळण लागल्यास सर्व जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असणार आहे यांची शासनाने नोंद घ्यावी.

जिल्हा अध्यक्षा सुस्मिता जाधव म्हणाल्या, वाळवा तालुका शांत आहे. पण आ. गोपीचंद पडळकर यांच्या सारख्या माणसाने जिल्ह्यात अशांतता निर्माण केली आहे. यास मुख्यमंत्री जबाबदार आहेत. आमच्या नेत्यांवर आरोप करण्याची यांची लायकी नाही.

माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील म्हणाले, वाळवा तालुका लोकनेते राजारामबापू पाटील यांना दैवत मानते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात हा आमदार आक्रमक आहे. आक्रमक असेल तो तुमचा आहे. त्याने आ.जयंतराव पाटील यांची माफ मागावी.

सुनिता देशमाने म्हणाल्या, लोकनेते राजारामबापू पाटील व कुसुमताई पाटील या जिह्याच्या विठ्ठल रुक्मिणी आहेत. या आमदाराने समाजाचा विचार केला का? हा फक्त माजीमंत्री . जयंतराव पाटील यांच्यावर भुंकण्याचे काम करीत आहे. जिह्यात याला फिरुन देणार नाही. अविनाश खरात म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील यांनी अठरा पगड जातीसाठी काम केले आहे. आमदार आमच्या समाजाला लागलेला कलंक आहे.

शंकरराव चव्हाण म्हणाले, आमच्या समाजातील अभियंत्यावर दबाव आणला. कोट्यावधी रुपयांची बिले काढली. या अभियंत्याचा घातपात झाला आहे. . जयंत पाटील यांची माफी मागित ली जात नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवले जाईल. यावेळी शैलेश सुर्यवंशी, महेश पाटील, पै.भगवान पाटील, आनंदराव मलगुंडे, मुनीर पटवेकर, अरुण कांबळे, पुष्पलता खरात, अशोक वाटेगावकर, रोझा किणीकर, शैलेश पाटील, संदीप पाटील, दिपक पाटील यांनी आ. गोपीचंद पडळकर यांचा निषेध व्यक्त केला.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुभाष सुर्यवंशी, कार्तिक पाटील, दिपक पाटील, राजेश पाटील, रणजित गायकवाड, विशाल सुर्यवंशी, विशाल माने, एम. जी. पाटील, लालासाहेब अनुसे, सचिन कोळी, दिलीप पाटील, पिरअल्ली पुणेकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

इस्लामपूर बंदला संमिश्र प्रतिसाद

. जयंत पाटील यांच्यावरील वक्तव्यावरुन इस्लामपूर शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बंद पाळण्यात आला. इस्लामपूर नागरिकांसह व्यापारी संघटनेने देखील त्यास प्रतिसाद देत बंद पाळला. दुपारनंतर बहुतांशी व्यवहार सुऊ झाले.

Advertisement
Tags :

.