Sangli News : इस्लामपूरमध्ये दुचाकी अपघातात बीएएमएस विद्यार्थ्याचा मृत्यू !
इस्लामपूर : भरधाव दुचाकीने पादचाऱ्यास धडक; मेडिकल विद्यार्थी ठार
इस्लामपूर : सांगली-इस्लामपूर महामार्गावर आंबेडकरनगर परिसरातील शेतकरी उद्यानासमोर दुचाकी अपघातात अविष्कार गोकुळ गायकवाड (२४ रा. प्रकाश हॉस्पिटल, मूळ रा. जामखेड, अहिल्यादेवीनगर) हा मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी ठार झाला. हा अपघात रविवारी रात्री १० बाजण्याच्या सुमारास घडला. यामध्ये पादचारी आदम ईश्वरा कांबळे (५६ रा. रमाईनगर, इस्लामपूर) हे गंभीर जखमी झाले.
अविष्कार हा आपल्या ताब्यातील मोटरसायकल (क्रमांक होंडा एक्सस्ट्रीम एम एच १६ सीएल ५६५९) ही घेवून चालला होता. यावेळी आदम कांबळे हे जेवण करून बाहेर फिरण्यासाठी रस्त्याच्या कडेने चालले होते. दरम्यान अविष्कार याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल भरधाव वेगाने, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याने कांबळे यांना पाठीमागून जोराची धडक दिली.
या अपघातानंतर अविष्कार गायकवाड हा रस्त्याच्याकडेला पडून जखमी झाला. त्याला तोंडावर व डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. तर कांबळे यांच्या पायास गंभीर इजा झाली आहे. कांबळे यांच्याबर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. हा अपघात भीषण होता. घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले होते. गायकवाड हा बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षासाठी शिक्षण घेत होता. या घटनेनंतर त्याच्या मित्रांनी हळहळ व्यक्त केली.
या प्रकरणी डॉ. संजय यशवंत देशमुख यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात बर्दी दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्यवंशी हे करीत आहेत.