Tarun Bharat Effect : सांगली-नांद्रे राज्यमार्गाचे काम सुरू !
वाहनचालकांकडून दैनिक तरुण भारतचे केले कौतुक
by महेबुब मुल्ला
नांद्रे : दैनिक तरुण भारत संवादने नांद्रे राज्यमार्ग १४२ राज्यमार्ग मूत्यूचा मार्ग असल्याची बातमी प्रसिध्द केली होती. याची दखल घेत या मार्गावरील खड्डे मुजवण्याचे काम सुरू झाल्यामूळे नेतेमंडळी, वाहनचालकांकडून दैनिक तरुण भारत संवादचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
सांगली नांद्रे राज्यमार्ग १४२ या मार्गावरून जिल्ह्यातील चार प्रमुख तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. सांगलीची बाजार पेठ, मिरज रेल्वे जंक्शन, विविध साखर कारखाने, एम आयडीसी, विविध कॉलेज, गॅस प्लांट, चितळे उद्यद्योग समूह, सुप्रसिद्ध पीर हजरत खॉजा कबीर दर्गा, औदुंबर दत्त मंदिर, विविध उद्योग धंदे, आसल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात सतत वाहतूक सुरू असते.
हा मार्ग सध्या वाहतूकीस अपुरा पडत असून या मार्गाची दैन्यावस्था झाल्याने वाहनचालकांत असंतोष दिसून येत आहे. ग्रामदैवत सुप्रसिद्ध पीर हजरत खॉजा कबीर यांचा ३१ डिसेंबरला उरुस आहे. फेब्रुवारीत नांद्रेत पंचकल्याणक महामहोत्सव होणार आहे. सध्या ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे.
यामुळे या मार्गावर वाहतूकीचे ताण असून हा मार्ग खराब झाल्याने हा मार्ग तात्काळ रुंदीकरण व डांबरीकरण झाले पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे. यांची दखल घेत शिवसेनेचे मोहसीन मुल्ला, स्वाभिमानाचीचे संदीप राजोबा, प्रदीप पाटील, महावीर भिलवडे यांनी देखील आंदोलनाचा गंभीर इशारा दिला आहे.