For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नांद्रे गावात विकसित भारत संकल्प याञेत प्रधानमंञी मोदीचा नागरिकांशी संवाद

05:41 PM Dec 09, 2023 IST | Abhijeet Khandekar
नांद्रे गावात विकसित भारत संकल्प याञेत प्रधानमंञी मोदीचा नागरिकांशी संवाद
Sangli Nandre Prime Minister Modi
Advertisement

नांद्रे प्रतिनिधी

आपला संकल्प विकास भारत,विकसित भारत याञेचा नांद्रेयात नांद्रे ग्रामपंचायत सरपंच सौ.पूजा भोरे,उपसरपंच अमितकुमार पाटील,एन.एस.पाटील,राजगोंडा पाटील,राहुल सकळे,सुदर्शन हेरले,पै.महावीर भोरे, नांद्रे ग्रामपंचायत सदस्य,सदस्या,विविध सहकारी संस्थाचे विविध पदाधिकारी, नांद्रे विद्यालय नांद्रे,आण्णासाहेब पाटील हायस्कूल,प्राथमिक आरोग्य केंन्द्र,नांद्रे ग्रामस्थांच्यावतीने या याञेचे जलोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंञी सुरेश खाडे यांनी शासनाच्या विविध योजनाबाबत मार्गदर्शन केले.

Advertisement

दुपारी 12.30 ला देशाचे प्रधानमंञी नरेंद्र मोदी यांनी येथील लाभार्थी,व नागरिकांशी संवाद साधत विकसित भारत संकल्पनाची माहिती दिली.यावेळी जिल्ह्यातून विविध पक्षाचे नेतेमंडळी,जिल्ह्यातील विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी वर्ग, बँकांचे अधिकारी,आरोग्य विभागातील अधिकारी,महसूल,शिक्षण,सर्वच विभागातील अधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.