Breaking : मिरजेत ठाकरे गटाचे कार्यालय जमीनदोस्त! पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट, पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरून कारवाईचा ठाकरे गटाकडून आरोप
ठाकरे गटाचे शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात; कार्यालयाची जागा बेकायदेशीर ठरवत पोलीस बंदोबस्तात महापालिका प्रशासनाची कारवाई
प्रतिनिधी मिरज
शहरातील किल्ला भाग येथे नव्याने उभारण्यात असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यालय बेकायदेशीर ठरवत जमीन दोस्त करण्यात आल्याने मोठा तणाव निर्माण झाला. महापालिका प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्ताच्या साह्याने सदर कार्यालय जमीनदोस्त केले. कार्यालयाच्या अतिक्रमण हटवण्यात विरोध करणाऱ्या शिवसेनेचे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांचा सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रशासनावर राजकीय दबाव असल्याने पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच ही कारवाई केल्याचा आरोप यावेळी सैनिकांनी केला.
हेही वाचा>>> मिरजेत दोन्ही शिवसेनेच्या शहर प्रमुखांमध्ये कार्यालय उभारण्यावरून राडा; अश्लील शिवीगाळ
शहरातील किल्ला भाग येथे सेतू कार्यालयाजवळ शिवसेनेचे विभागीय कार्यालय उभारण्याचे काम सोमवारी सकाळपासून सुरू होते. मात्र तिथे कार्यालय उभारण्यावरून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला होता. आमचे शिवसेना खरी असल्याने येथे आमचेच कार्यालय सुरू करण्यासाठी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे अर्ज केला होता. या कारणावरून उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत महिपुरे आणि शिंदे सेनेचे शहर प्रमुख किरण राजपूत यांच्या रदा झाला. यावेळी एकमेकांना असलेली शिवीगाळ करून एकमेकांना बघून घेण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला होता.
त्यानंतर महापालिका पथक आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. उद्धव सेनेजने उभारलेले कार्यालय बेकायदेशीर जागेत असल्याचा दावा करत ते काढून घेण्याचा सूचना महापालिकेने केल्या. मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सदर जागे संदर्भातील काही कागदपत्रे कागदपत्रे दाखवून सदर जागा आमचीच असल्याचा दावा केला.
मात्र त्यानंतरही प्रशासनाने सदर कार्यालय काढण्याची कारवाई सुरू केली. यामुळे शिवसैनिक संतप्त झाले. अर्धवट काम झालेल्या पत्र्याच्या खोक्यामध्ये शिवसैनिक आणि ठिय्या मारला. या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गाव शिवसैनिकांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मिरज शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमणे असताना तिथे कारवाई झाली नाही. मात्र शिवसेनेच्या कार्यालयावर कारवाई ही सुडबुद्धीतून केल्याचा आरोप करण्यात आला. राजकीय दबावाला बळी पडून अधिकाऱ्यांनी शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. पोलिसांनी सर्व शिवसैनिकाला ताब्यात घेतल्या असून, अतिक्रमण आणि शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.