For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मिरजेत 27 तास मिरवणूक...डीजेचा दणदणाट !

03:30 PM Sep 19, 2024 IST | Abhijeet Khandekar
मिरजेत 27 तास मिरवणूक   डीजेचा दणदणाट
Advertisement

मिरज प्रतिनिधी

डीजेचा दणदणाटात आणि मोरयाचा गजर करत मंगळवारी सुरू झालेल्या मिरवणुकीतील गणपती बाप्पांना तब्बल 27 तासांनंतर जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. मिरजेच्या गणेशोत्सवाच्या ऐतिहासिक विसर्जन सोहळ्यासाठी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. विसर्जन मिरवणूक मार्गावर ठिकाठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त होता. छत्रपती शिवाजी महाराज मंडळाच्या श्रींचे प्रथम व शेतकरी मंडळाच्या श्रींचे दुसऱ्या दिवशी दुपारी दीड वाजता शेवटचे विसर्जन झाले. यावेळी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा गजर करण्यात आला.

Advertisement

मुंबई-पुण्यानंतर सर्वा†धक प्रदीर्घ काळ चालणाऱ्या मिरजेच्या ऐतिहासिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी यंदा लाखोंचा जनसागर लोटला होता. विसर्जन मिरवणूक मार्गावर हिंदू एकता आंदोलन, आखिल भारतीय मराठा महासंघ, धर्मवीर छत्रपती संभाजी तऊण मंडळ, शिवसेना एकनाथ शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, मनसे, विश्वशांती संघटना, शेतकरी संघटना आाणि विश्वश्री पैलवान चौक आदी मंडळाकडून स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. याशिवाय विविध पक्ष व संघटनांसह महापालिका व शहर पा†लस ठाण्याकडून स्वागत स्टेज उभारले होते. मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व मंडळाचे स्वागत करण्यात येत होते.

यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत बहुतांशी मंडळानी डॉल्बीचा दणदणाटात केला. सकाळी 11 वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला होता. दुपारी तीन ते चार यादरम्यान बहुतांशी सामाजिक व सांस्कतिक मंडळांनी साध्या पद्धतीने व पारंपारिक वाद्यांच्या गजरात आपल्या श्रींना निरोप दिला. तर सायंकाळी पाच नंतर मुख्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. सुमारे दोनशेहून आ†धक मंडळाचे गणेश तलावात विसर्जन करण्यात आले. तसेच काही मंडळांचे कृष्णा घाट येथे विसर्जन करण्यात आले.

Advertisement

विसर्जन मिरवणुकीत मंगळवार पेठचा राजा, शनिवार पेठचा राजा, गजराज, मिरजेचा महागणपती, मिरजेचा सम्राट, लोणार समाज, रेवणीचा राजा आदी मंडळांच्या गणेश मूर्ती लक्षवेधी ठरल्या. सुमारे 27 तासांच्या विसर्जन मिरवणूक नंतर धनगर गली येथील शेतकरी गणेश मंडळाच्या बाळूमामा रूपातील गणपती बाप्पांना शेवटचा निरोप देण्यात आला. त्यानंतर मिरजेच्या ऐतिहासिक विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली.

Advertisement
Tags :

.